चंद्रपूर :भाजप नेते आणि माजी खासदार
किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बेनामी मालमत्तेत त्यांच्या बहिणी व इतर नातेवाईकांचा वाटा असल्याचा गंभीर आरोप केला. या आरोपावर खासदार
सुप्रिया सुळे यांनी चंद्रपूर येथील पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे सध्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधला. तसंच चंद्रपूर शहरात पत्रकार परिषदेत स्थानिक पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी किरीट सोमय्या यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की, ‘गेल्या ५० वर्षापासून पवार कुटुंबावर आरोप करून खूप लोक बातम्या करत आहेत. हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यांनी आमच्यावर टीका करत राहावी आणि आम्ही जनतेची सेवा करत राहू,’ असं त्या म्हणाल्या.
शिवसेनेत मतभेद? ठाण्यात रामदास कदमांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी
काय होते सोमय्या यांचे आरोप?
किरीट सोमय्या हे रविवारी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शांतीसागर मंगल कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबाला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेवर टीका केली.
‘ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेल्या शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे. माझ्याकडे असलेले कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय आणि सीबीआयकडे देणार आहे,’ असं सोमय्या यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही दरोडेखोरी असल्याची टीकाही त्यांनी केली.
Source link
Like this:
Like Loading...