सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेऊन राजकारण विरहीत कारखाना चालविणे आज काळाची गरज – आमदार प्रशांत परिचारक

मागील सर्व विक्रम मोडीत काढीत नवे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील – उमेश परिचारक
 मंगळवेढा /प्रतिनिधी:- जागतिक पातळीवरती साखरेला वाढत असणार्‍या मागणीमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने इथेनॉल निर्मितीस प्रोत्साहन दिल्यामुळे अडचणीत असणार्‍या साखर कारखान्यांना चांगला दिलासा मिळेल व पुढील तीन ते चार वर्षात साखर कारखानदारी अडचणीतून बाहेर निघेल व शेतकर्‍यांच्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होईल असा आशावाद सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.

कचरेवाडी ता.मंगळवेढा येथील युटोपियन शुगर्स लि.या कारखान्याच्या २०२१-२०२२ या आठव्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार दि.१७/१०/ २०२१ रोजी पांडुरंग स.सा.कारखान्याचे चेअरमन व युटोपियन शुगर्स चे मार्गदर्शक आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला.यावेळी कारखान्याचे चेअरमन उमेश परिचारक, रोहन परिचारक,ऋषिकेश परिचारक यांचेसह पांडुरंग स.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंत देशमुख,पंढरपूर कृ.उ.बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, शिवानंद पाटील, दाजी पाटील, दिलीप चव्हाण,सतीश मुळे,लक्ष्मण धनवडे,बाळासाहेब देशमुख,रतीलाल गावडे, राजुबापू गावडे, आगतराव रणदिवे,खंडेराव रणदिवे,अरुण घोलप, इन्नुसभाई शेख,शिवाजी नागणे,औदुंबर वाडदेकर,गौरीशंकर बुरकुल,सिद्धू सावकार,जालिंदर हुन्नुर्गी,राजू पाटील,नितिन पाटील,नामदेव जानकर,बाळ दादा काळुंगे, संभाजी माने,पांडुरंग हाके,धनाजी कोळेकर, कल्याण नलवडे अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे,सी.एन.देशपांडे तसेच ऊस उत्पादक , तोडणी वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे सर्व खातेप्रमुख,अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

  यावेळी पुढे बोलताना आ.परिचारक म्हणाले, युटोपियन चा हा आठवा गळीत हंगाम असून  मागील सात ही हंगामात युटोपियन ने विक्रमी उत्पादन केले आहे. सध्या राज्यातील व परिसरा तील कारखानदारी अडचणीत असल्याने ऊस उत्पादक चिंतेत आहेत.मात्र,सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेऊन राजकारण विरहीत कारखाना चालविणे आज काळाची गरज आहे. त्यासाठी त्यांचाही ऊस गळीतास आणण्याच्या दृष्टीने युटोपियन शुगर्स प्रयत्न करणार आहे.देशाचे रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे साखर उद्योगासाठी सकारात्मक असून,त्यांच्या प्रयत्नाने इथेनॉल निर्मितीस चालना मिळत आहे.त्यामुळे देशांतर्गत असणार्‍या जास्तीच्या साखरेचे उत्पादन कमी होऊन,उपलब्ध साखरेस चांगला दर मिळेल त्यामुळे सर्वच साखर कारखान्यांनी एकूण गाळपाच्या ३०% पर्यन्त इथेनॉल बनवणे गरजेचे आहे असे मत आ.परिचारक यांनी व्यक्त केले.

       स्वागत व प्रास्ताविकात चेअरमन उमेश परिचारक म्हणाले की,मोठ्या मालकांच्या आदर्शावरती आम्ही वाटचाल करीत असून,सध्या साखर कारखानदारी अडचणीत आहे.मात्र शेतकर्‍यांच्या ऊसाला योग्य तो दाम देण्याची भूमिका आम्ही घेत असून,गळीत हंगाम २०२०- २१ मध्ये गळीत झालेल्या ऊसासाठी एकूण दर २२०० रु प्रमाणे आम्ही देणार आहोत तसेच कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस देणार असल्याची घोषणा उमेश परिचारक यांनी केली.

  पुढे बोलताना उमेश परिचारक म्हणाले की, चालू गळीत हंगामामध्ये विक्रमी ऊसाची नोंद आहे. मागील सर्व विक्रम मोडीत काढीत नवे उद्दीष्ट गाठण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सध्या सततच्या पाऊसामुळे चालू वर्षी ऊसतोडणी मध्ये विलंब होण्याची शक्यता असून चालू गळीत हंगाम हा लांबण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे.त्यामुळे कारखानदारांसमोर असणार्‍या अडचणींमध्ये वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही चालू गळीत हंगामात युटोपियन शुगर्स हा ६.५ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करेल व कारखान्याच्या आसवांनी प्रकल्पातून १ कोटी ५० लाख लिटर इथेनॉल चे उत्पादन करण्यात येणार आहे.तसेच चालूगळीत हंगामाकरिता युटोपियन शुगर्स च्या कर्मचारी व अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी मा.जि.प.सदस्य शिवानंद पाटील, पांडुरंग स.सा.कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंत देशमुख यांनी समयोचित भाषणे करून गाळप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या.

पंढरपूर कृ.उ.बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे यांनी २२०० रु.दर जाहीर केल्याबद्दल चेअरमन उमेश परिचारक यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सेल अकौंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: