हायलाइट्स:
- राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात
- २ हजारांपेक्षा कमी नव्या करोना रुग्णांची नोंद
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के
राज्यात आज १ हजार ७१५ नवीन रुग्णांचं निदान झालं. आज २ हजार ६८० रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्यात आजपर्यंत एकूण ६४,१९,६७८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ टक्के एवढं झालं आहे.
रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरीही राज्यात अजूनही काही रुग्णांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. राज्यात आज २९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१०,२०,४६३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९१,६९७ (१०.८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,२०,४७४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
शनिवारी राज्यात कशी होती स्थिती?
राज्यात काल शनिवारी १ हजार ५५३ नवीन रुग्णांचे निदान झाले होते. तसंच २६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली होती.