भ.महावीर अभ्यासिका सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून जास्तीत जास्त निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
कोल्हापूर - द.भारत जैन सभेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भगवान महावीर अभ्यासिका केंद्र सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी दोन एकर जमीन दिली आहे.या जागेवर 8 ते 10 कोटी रूपये खर्चुन सर्व सोयीसुविधा असणारी भव्य दिव्य अशी इमारत बांधण्यात येणार आहे.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतून निधी मिळावा यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री डाॅ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विशेष लक्ष घालून या कामासाठी मदत केली.त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारत जैन सभेच्या शिष्टमंडळाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन भ.महावीर अभ्यासिका सुरू करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.यासाठी महाराष्ट्र शासनाच्या निधीतुन जास्तीत जास्त निधी मंजूर करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल,आरोग्य राज्यमंत्री डाॅ राजेंद्र पाटील यड्रावकर ,दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष उद्योगपती भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब आण्णा पाटील,खजिनदार संजय शेटे ,डाॅ.J.F.पाटील सर,डाॅ.आण्णासाहेब चोपडे , सुरेश रोटे ,प्रा.ककडे ,उद्योजक रविंद्र माणगावे ,राजेंद्र झेले आदी उपस्थित होते .