‘सिंघू सीमेवर हात पाय कापून दलिताची क्रूर हत्या, काँग्रेस मूग गिळून गप्प का?’


चंदिगडः सिंघू सीमेवर लखबीर सिंग या तरुणाची शुक्रवारी हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स लटकलेला आढळून आला होता. निहंग शिखांवर त्याच्या हत्येचा आरोप आहे. या घटनेने देशभरात खळबळ उडाली. ज्या तरुणाची हत्या झाली तोद लित समाजाचा होता. हत्या झालेल्या तरुणावर शीख परंपरेनुसार अंत्यविधीही करू दिला नाही. या घटनेवर पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेसकडून कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. यावरून विरोधकांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी घटनेवरून गोंधळ निर्माण करणाऱ्या काँग्रेस सिंघू सीमेवरील घटनेबाबत गप्प का आहे? असा सवाल भाजपने केला आहे. सिंघू सीमेवर एका दलिताची हत्या झाली. पण काँग्रेसने कार्यकारिणीने कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, यावरून भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी टीका केली आहे.

‘चुकीचं म्हणण्याची हिंमत नाही’

दलिताच्या हत्येप्रकरणी ‘तालिबानी मानसिकता’ असलेल्यांच्यासोबत काँग्रेस आहे का? अराजक तत्व आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांचा उपयोग करत आहेत. मतांच्या राजकारणासाठी विरोधी पक्ष आणि विशेषकरून काँग्रेस या प्रकरणी मुग गिळून गप्प आहे. काँग्रेसमध्ये चुकीच्या गोष्टीला चकुीचं म्हणण्याची हिंमत नाही. कारण हे त्यांच्या राजकारणाला शोभेसं नाही, असं गौरव भाटिया म्हणाले.

काँग्रेस शासित राज्यांमध्ये हा प्रश्न का उपस्थित केला जात नाही?

काँग्रेस गप्प का आहे? लखीमपूर खिरी हिंसेप्रकरणी काँग्रेस पायाच्या बोटांवर उडत होती. कारण ही घटना भाजपशासित राज्यात घडली होती. राज्यस्थानमध्ये प्रेम प्रकरणातून दलिताची हत्या केली गेली. त्यावर काँग्रेस का गप्प आहे? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन काही गुन्हेगारींनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वीही एका महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी गंभीर गुन्हे घडत आहे. यामुळे हे तालिबान प्रमाणे वागत असून कट्टरतावाद पसरवत आहेत, असा आरोप भाजपचे राज्यसभा खासदार दुष्यंत गौतम यांनी केला.

navjot singh sidhu : पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम; सिद्धूंचे सोनिया गांधींना पत्र, भेटीसाठी वेळ मागितली

सिंघू सीमेवर हत्येप्रकरणी आतापर्यंत ४ जणांना अटक

दिल्ली-हरयाणादरम्याच्या सिंघू सीमेवर दलित तरुणाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी शनिवारी ३ जणांना अटक केली गेली. भगवंत सिंग, गोविंद प्रीत सिंग आणि नारायण सिंग यांना अटक करण्यात आली होती. या ३ आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यापूर्वी शुक्रवारी निहंग सरबजीत सिंग हा पोलिसांना शरण आला होता. त्याला कोर्टाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
rajasthan congress : आता राजस्थानचा नंबर! CM गहलोतांसोबत राहुल, प्रियांकांची ‘विशेष बैठक’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: