नवी दिल्ली: भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केल्यानंतर प्रथमच सर्व राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलावण्यात आली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची आणि पक्षाचा विजय निश्चित करण्याची जबाबदारी दिली जाईल. करोना काळातील हा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निवडणुकीचा रणसंग्राम आहे. यात उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील ऐतिहासिक विजयाची पुनरावृत्ती करण्याचे भाजप समोर आव्हान आहे. तर गोव्यात तिसऱ्यांदा सत्तेवर परतण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. पंजाबमध्ये अस्तित्व कामय ठेवण्यासाठी आणि मणिपूर काँग्रेसला पुन्हा पराभूत करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.
देशात पक्षाच्या सुरू असलेल्या कार्यक्रमांचा आढावा आणि नवीन कार्यक्रमांचे बाबतही पदाधिकाऱ्या या बैठकीत नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. करोना काळात प्रथमच सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावली आहे.
navjot singh sidhu : पंजाब काँग्रेसमधील धुसफूस कायम; सिद्धूंचे सोनिया गांधींना पत्र, भेटीसाठी वेळ मागितली
पदाधिकाऱ्यांच्या या राष्ट्रीय बैठकीला पंतप्रधान मोदी हे संबोधित करतील, अशी शक्यता आहे. या बैठकीच्या समारोपाचं भाषण पंतप्रधान मोदी करतील. गरीबांना रेशन, सर्वांना करोनाची मोफत लस, अशा करोना काळात सरकारने केलेल्या कामांचा उल्लेख केला जाईल. तसंच आगामी निवडणुकांसाठी पक्ष कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
Sonia Gandhi: माझ्याशी मीडियाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही, सोनियांनी ‘जी २३’ला सुनावलं
Source link
Like this:
Like Loading...