धोनी आयपीएल २०२२ मध्ये खेळण्याबाबत आली मोठी अपडेट; CSKचे अधिकारी म्हणाले…


चेन्नई : महेंद्रसिंह धोनी हा आयपीएल २०२२मध्ये पिवळ्या जर्सीमध्येच म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडूनच खेळणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. सीएसकेच्या व्यवस्थापनाने धोनीला कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शवली आहे. आयपीएल २०२२च्या लिलावात पहिले रिटेन्शन कार्ड फक्त धोनीसाठी वापरले जाईल, असे सीएसकेने स्पष्ट केलं आहे. आयपीएल २०२१चे जेतेपद जिंकल्यानंतर प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगलेशी केलेल्या संभाषणावेळी आयपीएल २०२२मध्ये खेळण्याबाबतचे संकेत दिले होते. क्रिकेटचा वारसा सोडणार का असा प्रश्न हर्षा भोगलेंनी विचारला होता. त्यावर बोलताना धोनी म्हणाला की, मी आताच असे काही करणार नाही.

वाचा- मला कल्पना नाही; राहुल द्रविडच्या नियुक्तीवर विराटचे धक्कादायक उत्तर

त्यानंतर आता चेन्नई संघ व्यवस्थापनानेही धोनीच्या त्या वक्तव्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सीएसकेच्या एका अधिकाऱ्याने एएनआयशी बोलताना सांगितले की, “खेळाडूंना कायम ठेवण्यात येईल हे खरे आहे, पण किती खेळाडूंना कायम ठेवता येईल, याबाबत काही ठरलेले नाहीय. खरं सांगायचं झालं तर रिटेन्शनची प्रक्रियेचा धोनीवर काही परिणाम होणार नाही. त्याच्यासाठी ही दुय्यम गोष्ट असेल. आम्ही त्याच्यासाठी आमचे पहिले रिटेन्शन कार्ड वापरू. सीएसकेला त्यांच्या कर्णधाराची गरज आहे आणि तो पुढच्या वर्षी खेळेल, याचाही हा पुरावा आहे.”

वाचा- राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला फॅनने दिली धमकी, “हरला तर घरी येऊ देणार नाही”

आयपीएल २०२१ चे जेतेपद जिंकलं
एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने ४ आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीत चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करून जेतेपद पटकावले. सीएसकेचा फलंदाज फाफ डु प्लेसिस आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. तसेच यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडला (६३५ धावा) ऑरेंज कॅप मिळाली.

धोनी बनणार मेंटॉर
सीएसकेला चौथ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनवल्यानंतर धोनी आता टी-२० विश्वचषक मोहिमेसाठी टीम इंडियाच्या गोटात सामील झाला आहे. इथे तो टीम इंडियाचा मेंटॉर म्हणून भूमिका बजावेल. कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की, धोनीची उपस्थिती संघाचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी काम करेल. धोनीकडे आयसीसीची सर्व प्रमुख जेतेपदे जिंकण्याचा अनुभव आहे. आणि हे टीम इंडियासाठी उपयुक्त ठरू शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: