विमा बाजार बदलतोय; लोक एजंटऐवजी स्वतः खरेदी करत आहेत ऑनलाइन मुदत विमा


हायलाइट्स:

  • देशातील मुदत विमा (टर्म लाइफ) क्षेत्रात ऑनलाईन विक्रीला गती मिळत आहे.
  • लोक आता एजंट आणि सल्लागारांऐवजी ‘टर्म लाइफ’ विमा ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.
  • गेल्या आर्थिक वर्षात एकूण टर्म लाइफ विम्याच्या १२.५ टक्के विमा ऑनलाइन खरेदी केले होते.

मुंबई : देशातील मुदत विमा (टर्म लाइफ) क्षेत्रात ऑनलाईन विक्रीला गती मिळत आहे. लोक आता एजंट आणि सल्लागारांऐवजी ‘टर्म लाइफ’ विमा ऑनलाईन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. मॅक्स लाईफ इन्शुरन्सच्या एका वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. विश्वानंद म्हणाले की, भारतीय ग्राहकांनी गेल्या आर्थिक वर्षात एकूण टर्म लाइफ विम्याच्या १२.५ टक्के विमा ऑनलाइन खरेदी केले होते.

जीडीपीत होणार सुधारणा; ‘डीएसपी’चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुली
ते पुढे म्हणाले की, “ऑनलाइन पर्याय आमच्यासारख्या काही कंपन्यांसाठी उत्पादने विकण्याचा एक महत्त्वाचा मार्ग बनला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात मॅक्स लाईफचा बाजार हिस्सा ३० टक्क्यांच्या जवळपास होता. सध्या हा वाटा देखील सारखाच आहे, याचा अर्थ असा की, भारतातील तीन ऑनलाईन टर्म लाइफ इन्शुरन्स खरेदीपैकी एक विमा हा मॅक्स लाइफचा आहे. ऑनलाइन विमा खरेदी करणाऱ्या विमा धारकांचे सरासरी वय ३६ आहे. आणि या ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसादाच्या आधारावर कंपनीने आणखी काही नवीन योजना आणल्या आहेत.

भाव कमी, खरेदी जोरात ; सहामाहीत सोने आयात तब्बल चार पटीने वाढली
ऑनलाइन पॉलिसी खरेदी करणे आहे सोपे
ते म्हणाले की, कंपनीने क्रेडिट ब्युरो कंपन्यांशीही करार केला आहे, जेणेकरून आम्ही आमच्या ६० टक्के ई-कॉमर्स ग्राहकांकडून कोणतीही प्रकारचे अतिरिक्त कागदपत्र मागत नाही. यामुळे ग्राहकांना विमा उत्पादने ‘ऑनलाईन’ खरेदी करणे सोपे झाले आहे.

सोन्यामध्ये गुंतवणूक करता : ‘सेबी’ने आखलेली नवीन चौकट काय? कसा होईल परिणाम
मुदत विमा आणि जीवन विमा मध्ये काय फरक आहे?
मुदत विमा आणि पारंपरिक जीवन विमा यांच्यात महत्वाच्या फरकासह काही फायदे आणि तोटे आहेत. मुदत विमा आणि जीवन विमा यातील सर्वात मोठा फरक म्हणजे मृत्यूनंतरचा लाभ (डेथ बेनेफिट). टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये डेथ बेनिफिट तेव्हाच मिळतो, जेव्हा विमाधारक मुदतीच्या कालावधीत मरण पावला असेल. आणि जीवन विमा पॉलिसीमध्ये विमाधारकाला मृत्यू आणि मॅच्युरिटी या दोन्हीचा लाभ मिळतो.

टर्म इन्शुरन्समध्ये मिळवा अधिक संरक्षण
मुदत विमा योजनेत उपलब्ध असलेल्या मृत्यूनंतरच्या लाभाची रक्कम ही जीवन विमा योजनेमध्ये उपलब्ध असलेल्या मॅच्युरिटीच्या लाभापेक्षा खूप जास्त आहे, पण बहुतेक तज्ज्ञ मृत्यूनंतर मॅच्युरिटीवर रिटर्नच्या फायद्यासाठी जीवन विमा योजना घेण्याची शिफारस करतात. पण किमान एक मुदत विमा योजना असावी, ज्याच्या किमान प्रीमियमच्या रकमेमध्येही अधिक डेथ बेनेफिट मिळेल. टर्म इन्शुरन्समध्ये विमाधारक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला डेथ बेनेफिटचा लाभ मिळतो. जीवन विमा योजनेमध्ये मॅच्युरिटीवर परताव्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ज्यांना फक्त डेथ रिस्क कव्हर करायचं आहे. आणि जादा प्रीमियम भरणेही परवडत नाही, ते मुदत विमा योजना (टर्म इन्शुरन्स) खरेदी करू शकतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: