राष्ट्रीय संघाच्या कर्णधाराला फॅनने दिली धमकी, “हरला तर घरी येऊ देणार नाही”


नवी दिल्ली : पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची वाट प्रत्येक क्रिकेटप्रेमी पाहत असतो. भारत-पाकिस्तानमधील हा हाय होल्टेज सामना येत्या २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्या आधी पाकिस्तान संघाच्या एका भारावलेल्या चाहत्याने कर्णधार बाबर आझमला धमकी दिली आहे. जर तुम्ही २४ ऑक्टोबरचा सामना जिंकला नाही, तर तुम्हाला घरी येऊ देणार नाही, असं या चाहत्यानं म्हटलं आहे.

वाचा- मला कल्पना नाही; राहुल द्रविडच्या नियुक्तीवर विराटचे धक्कादायक उत्तर

टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही देशातील चाहते या सामन्याबद्दल खूप उत्सुक आहेत. जेव्हा जेव्हा या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये सामना होतो, तेव्हा फक्त खेळाडूच, नव्हे तर चाहतेही त्यांच्या संघाच्या विजयापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट महत्वाची वाटत नाही. सामना जसा जवळ येईल, तशा चाहत्यांच्या प्रतिक्रियाही येऊ लागतात.

जेव्हा बाबर आझमने या स्पर्धेसाठी चाहत्यांच्या पाठिंब्याची आणि शुभेच्छांची गरज आहे, अशा आशयाची एक पोस्ट ट्विटरवर केली. तेव्हा काही चाहत्यांनी बाबर आणि त्याच्या संघाला शुभेच्छा दिल्या. तर काहींनी धमकी देणारी प्रतिक्रिया नोंदवली. राहील भट नावाच्या एक नेटकऱ्याने बाबरला धमकी देत घरी परतू देणार नाही, असा इशारा दिला आहे. तर काहींनी ‘मौका-मौका’ या जाहिरातीचा उल्लेख करत लिहिले आहे की, ही शेवटची संधी आहे. दरम्यान, कट्टर प्रतिस्पर्धी असलेले दोन्ही संघ टी-२० विश्वचषकात आतापर्यंत पाचवेळा आमनेसामने आले आहेत, आणि प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.

दुसरीकडे, आझमने हा सामना जिंकणार असल्याचा दावा केला आहे. तो म्हणाला की, ‘आम्ही गेल्या तीन वर्षांपासून यूएईमध्ये क्रिकेट खेळत आहोत आणि इथल्या परिस्थितीची चांगली माहिती आहे. सामन्याच्या दिवशी जो संघ अधिक चांगला खेळेल, तोच जिंकेल. मला वाटते की आम्ही जिंकू.”Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: