जीडीपीत होणार सुधारणा; ‘डीएसपी’चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला


हायलाइट्स:

  • आर्थिक चक्र व आर्थिक सुधारणांतून होणाऱ्या वाढीच्या पुनरुज्जीवनाचा लाभ घेण्यासाठी हा फंड पुन्हा खुला
  • सरकारी, खासगी व रिअल इस्टेट या तीन क्षेत्रांतील महत्त्वाच्या विभागां वरील खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे.
  • जागतिक स्तरावरील आवश्यकते चा फायदा घेऊन उत्पादनाचा आवाका वाढवण्याची उत्तम संधी भारताला आहे

मुंबई : डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्सने (डीएसपीआयएम) डीएसपी इंडिया टीआयजीईआर (T.I.G.E.R.- द इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ अँड इकोनॉमिक रिफॉर्म फंडाचा) ओल्ड फंड ऑफरिंग अर्थात ओएफओ जाहीर केला आहे. आर्थिक चक्र व आर्थिक सुधारणांतून होणाऱ्या वाढीच्या पुनरुज्जीवनाचा
लाभ घेण्याच्या गुंतवणूकदारांना मिळालेल्या संधी वर प्रकाश टाकण्यासाठी ओएफओ जाहीर करण्यात आला आहे.

डीएसपीआयएमच्या मते, गुंतवणूक चक्रतळाला गेले आहे आणि आता या चक्राला वर जाण्यासाठी आवश्यकते सर्व घटकउपस्थित आहेत. यामुळे खर्चाची दृश्यमानता ३-५वर्षे टिकणार आहे. अनुकूल ढोबळ अर्थशास्त्र व महत्त्वाच्या सुधारणांची अंमलबजावणी यांमुळे बाजाराचे महत्त्वाचे आधारस्तंभ स्थिर राहणे अपेक्षित आहे. म्हणूनच संरचना क्षेत्रातील गुंतवणूक देशाच्या जीडीपीला चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.

सोन्यामध्ये गुंतवणूक करता : ‘सेबी’ने आखलेली नवीन चौकट काय? कसा होईल परिणाम
सरकारी, खासगी व रिअल इस्टेट या तीन क्षेत्रांतील महत्त्वाच्या विभागां वरील खर्चात वाढ होणे अपेक्षित आहे. राष्ट्रीय संरचनेवर भर देणाऱ्या सरकारच्या उपक्रमांमुळे रस्ते, रेल्वे, पाणी व विमानतळ यांसारख्या क्षेत्रांवरील खर्च पुढील काही वर्षे वाढणार आहे. यामुळे सिमेंट, स्टील आणि अन्य भांडवली उपकरणां सारख्या महत्त्वाच्या कच्च्या मालाची मागणी वाढणार आहे व पर्यायाने खासगी क्षेत्रातील क्षमता उपयोजनाला चालना मिळेल आणि कॅपेक्सचे पुनरुज्जीवन होईल. सर्वांत कमी गहाण दर (मॉर्गेजरेट्स), मालमत्तेच्या स्थिर किंमती आणि कर समायोजित गहाण दर व भाड्यापोटी मिळणारे उत्पन्नयांच्यातील तफावत गेल्या अनेक दशकांशी तुलना करता सर्वांत कमी असणे या तीन घटकांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील
रचनात्मक चालना मागणी चक्रासाठी पुढील अनेक वर्षे कायम राहील,असा अंदाज आहे.

भाव कमी, खरेदी जोरात ; सहामाहीत सोने आयात तब्बल चार पटीने वाढली
पुरवठा साखळीचे विविधी करणकरण्याच्या जागतिक स्तरावरील आवश्यकते चा फायदा घेऊन उत्पादनाचा आवाका वाढवण्याची उत्तम संधी भारताला आहे, असे ‘डीएसपीआयएम’ला वाटते. सरकारने सुरू केलेल्या आयातीत कपात, शुल्कांची आकारणी आणि कामगिरीशी निगडित इन्सेंटिव्ज अर्थात पीएलआययोजनेचा भाग म्हणून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी उत्तेजन आदी उपक्रमांची उद्दिष्टपूर्तीसाठी मदत होणार आहे. पीएलआयशी निगडित गुंतवणुका येत्या पाच वर्षांत इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, औषधनिर्मिती आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात होणे अपेक्षित आहे.

जाणून घ्या ; SBI ची कृषक उत्थान योजनेचे फायदे आणि कसा लाभ मिळवाल
या कॅपेक्स चक्रात ऑटोमेशन व डिजिटायझेशन, डेटासेंटर्स, नूतनीकरणीय ऊर्जा व इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या नवीन प्रवाहांचा उदय होताना ही डीएसपीआयएमला दिसत आहे. या गुंतवणूक करण्याजोग्या विभागांचे निफ्टी फिफ्टी इंडेक्समधील वजन डिसेंबर ०७ मध्ये ६७ टक्के होते, तर सप्टेंबर २१ मध्ये ते २५ टक्क्यांवर आले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूक चक्रातील तेजीचा लाभ घेण्याची संधी थीमॅटिक फंड्स देऊ करतात.

पोस्ट ऑफिसची हटके स्कीम; एकदा गुंतवा अन् प्रत्येक महिन्याला कमाई करा
“भारताचे कॅपेक्स चक्राला सध्या पीएलआय, कॉर्पोरेटकरातील सवलत, उद्योगांचे उच्च उपयोजन यांसारखी उच्चत्तम सरकारी धोरणे व कमी झालेले व्याजदरयांची जोड मिळाली आहे .हे घटक एकत्र आल्यामुळे गुंतवणुकीच्या मागणीवर उभारणी करणे शक्य झाले आहे. गुंतवणूकदारांसाठी निर्माण झालेल्या संधी वर प्रकाश टाकण्याची आणि संधीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व गुंतवणुकीची भक्कम चौकट लाभलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना देण्याचीही उत्तम वेळ आहे ,असे आम्हाला वाटते,” असे डीएसपी इन्व्हेस्टमेंटमॅनेजर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पेन पारेख सांगतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: