हायलाइट्स:
- अजित पवारांच्या बेनामी संपत्तीत बहिणी आणि मेव्हण्यांचाही हिस्सा
- किरीट सोमय्या यांचा आरोप
- शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा; ‘हे’ नेते रडारवर
या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप करत राष्ट्रवादी आणि पवार परिवाराला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेवर टीका केली. ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल असलेले शरद पवारांनी माझ्या आरोपाला उत्तर द्यावे, हे कागदोपत्री पुरावे मी ईडी, उच्च न्यायालय आणि सीबीआयकडे देणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. महाविकास आघाडी सरकारने केलेले भ्रष्टाचार ही दरोडेखोरी असल्याची टीका सोमय्या यांनी केली.
इतकंच नाहीतर, महाविकास आघाडी सरकारच्या विविध नेत्यांवर गैरकारभाराचे आरोप करणारे भाजप नेता किरीट सोमय्या यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची बेनामी कंपन्यांत गुंतवणूक असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून याबद्दल मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यावे लागेल, असे ते म्हणाले आहेत.
शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा; ‘हे’ नेते रडारवर
प्राप्तिकर विभागाने ९ दिवस टाकलेल्या छाप्यांचा दुसरा अहवाल येणे बाकी आहे. हे एक हजार कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार असून यात १५ सहकारी, पत्नी, मुलगा, बहीण यांच्या नावाखाली घोटाळा करण्यात आला आहे, असा दावा अजित पवारप्रकरणी सोमय्या यांनी केला. सुनेत्रा पवार या दोन डझन कंपन्यांमध्ये संचालक तर तीन डझन कंपन्यांमध्ये भागधारक, मालक आहेत. बहिणी, मुलगा, यजमान त्यांचा मुलगा यांच्या नावेही बेनामी कंपन्या आहेत. हे आधी एक होल्डिंग कंपनी तयार करतात, मग त्याच्या अंतर्गत कंपन्या करतात. सरकारी मालमत्ता कवडीमोल दरात विकत घेतात. जरंडेश्वर कंपनी यांचीच आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांचीच आहे. पदाचा दुरुपयोग करून त्यांनी हे सर्व मिळवले आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला.
सीबीआय, ईडीची कारवाई सुरूच राहणार
महाविकास आघाडी सरकारचे अनेक नेते सीबीआयवर आगपाखड करत आहेत. मात्र त्यानंतरही या यंत्रणांची कारवाई सुरूच राहणार आहे, असे ते म्हणाले.