जाणून घ्या ; SBI ची कृषक उत्थान योजनेचे फायदे आणि कसा लाभ मिळवाल


हायलाइट्स:

  • एसबीआय कृषक उत्थान योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १ लाख रुपयांचे क्रेडिट उपलब्ध करून देण्यात येते.
  • यापैकी, उपभोग क्रेडिट जास्तीत जास्त २० हजार रुपये असेल.
  • या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षेची गरज भासणार नाही.

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी देशात अनेक योजना चालवल्या जात आहेत. यामध्ये विविध कर्ज योजनांचाही समावेश आहे. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील शेतकऱ्यांना शेतीमध्ये मदत करण्यासाठी अशी एक योजना चालवते, ज्याला एसबीआय कृषक उत्थान योजना (SBI Krishak Uthan Yojna) असे नाव आहे. भाडेकरू, भागधारक आणि दस्तऐवज नसलेल्या पट्टेदारांना तसेच ज्यांच्याकडे जमिनीच्या नोंदी नाहीत आणि शेती करण्याबाबत अशी लेखी घोषणा/कागदपत्रे नाहीत, त्यांना अल्प मुदतीचे उत्पादन आणि उपभोग क्रेडिट प्रदान करणे, हा या योजनेचा उद्देश आहे.

सोनं झालं स्वस्त ; दसऱ्याला सोने आणि चांदीमध्ये झाली मोठी घसरण
योजनेची वैशिष्ट्ये
एसबीआय कृषक उत्थान योजनेअंतर्गत जास्तीत जास्त १ लाख रुपयांचे क्रेडिट उपलब्ध करून देण्यात येते. यापैकी, उपभोग क्रेडिट जास्तीत जास्त २० हजार रुपये असेल. या कर्जासाठी कोणत्याही सुरक्षेची गरज भासणार नाही. कर्जाची परतफेड करण्याचा प्रश्न येतो, तर विक्रीतून मिळालेली रक्कम फक्त रोख क्रेडिट खात्याद्वारे भरण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

पोस्ट ऑफिसची हटके स्कीम; एकदा गुंतवा अन् प्रत्येक महिन्याला कमाई करा
हे कर्ज कोण घेऊ शकते
असे सर्व भूमिहीन मजूर, भागधारक, भाडेकरू शेतकरी, अलिखित पट्टेदार (तोंडी भाडेकरू आणि छोटे शेतकरी) ज्यांच्याकडे जमिनीची नोंद नाही, ते एसबीआय कृषक उत्थान योजनेअंतर्गत कर्ज घेण्यास पात्र आहेत. त्यांच्याकडे कायम निवासाचा पुरावा असावा आणि गेल्या २ वर्षांपासून त्याच ठिकाणी राहत असावेत.

IMF ने व्यक्त केली चिंता; करोनाच्या नव्या व्हेरियंटचे जगभरात होणार गंभीर परिणाम
आवश्यक कागदपत्रे –
– निवासाचा पुरावा
– ओळखीचा पुरावा
– निर्दिष्ट स्वरूपात प्रतिज्ञापत्र अर्थात नोटरी केलेले शपथपत्र



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: