‘ते स्वतः गरळ ओकत आहेत’; अरविंद सावंत यांचा भाजपवर निशाणा


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेकांना पोटदुखी झाली आहे. हे सरकार दोन दिवसांत पडेल, असे ही मंडळी पहिल्यापासून म्हणत आहेत. ज्यांच्या पोटात मळमळ आहे ते स्वतः गरळ ओकत आहेत. होळीच्या होळकरांना ना देशाचे, ना राज्याचे महत्त्व आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर केली.

यावेळी ते म्हणाले की, आमचे हिंदुत्व कोणते आहे हे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी सांगितले. यापुढे आपण हिंदू म्हणून जगूया आणि हिंदुस्थान हा माझा धर्म आहे असे समजून आपण वागले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या त्या वागण्याचा अर्थ समजला पाहिजे. कारण गेली दोन वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतदेखील हीच भाषा वापरत आहेत. अजूनही त्यांना आपल्याच माणसाला समजवता येत नसेल तर ते इतरांना काय समजणार, असा प्रश्नही त्यांनी केला.

वाचाः ‘त्यांच्या’ डोक्यात सत्तेची गुर्मी, देशातील जनता योग्यवेळी उत्तर देईल: पवार

जे बाहेर पडलेत त्यांना बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षातून काढले हे लक्षात घ्या. अन्य एका व्यक्तीस शिवसेनाप्रमुख व्हायचे होते. त्यासाठी ती तडफड होती. ती तडफड पूर्ण झाली नाही म्हणून ते बाहेर पडले. आता ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे म्हणणारी माणसे कालपर्यंत त्यांना मराठी हृदयसम्राट अशी उपाधी लावत होते. त्यांना गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असे सावंत म्हणाले.

वाचाः महाराष्ट्रात पुढचं सरकार कुणाचं असेल?; शरद पवार यांनी केलं मोठं विधान



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: