IPL 2021 : धोनीने फक्त जडेजाला घेऊन कसे ‘सर’ केले शिखर, जाणून घ्या काय होती स्पेशल प्लॅनिंग


पुणे : आयपीएल २०२१ च्या उत्तरार्धात सर्व संघांमध्ये किमान २ फिरकीपटू दिसून आले, पण धोनीने फक्त एका फिरकीपटूला खेळविण्यावर विश्वास ठेवला. एकट्या ‘सर’ रवींद्र जडेजाच्या ४ षटकांनी धोनीसाठी जे काम केले, ते उर्वरित संघांच्या २ फिरकीपटूंच्या ८ षटकांना जमलं नाही. आणखी एक फिरकीपटू मोईन अलीसुद्धा संघात होता, पण त्याची भूमिका तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची होती. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आयपीएल २०२१ची अंतिम लढत. या सामन्यात मोईनने एकही षटक टाकले नाही, तर मुख्य फिरकीपटू रवींद्र जडेजाने त्याच्या कोट्यातील पूर्ण ४ षटके टाकली आणि २ बळीही घेतले. दुसरीकडे, उर्वरित संघांबद्दल बोलायचे झाले, तर प्रत्येकाने किमान २ फिरकीपटू खेळवले आहेत. सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्स संघाचा एक भाग राहिले. या दोघांनी मिळून चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात जेवढे बळी घेतले, तेवढे जडेजाने एकट्याने घेतले आहेत.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने चौथ्यांदा विजेतेपद मिळवले आहे. चेन्नई सुपर किंग्जला गेल्या हंगामात सर्वात आधी स्पर्धेबाहेर पडावे लागले होते, तोच संघ यंदाच्या आयपीएल २०२१ मध्ये प्लेऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ बनला. या संघाने सर्वात आधी अंतिम फेरीत प्रवेश केला आणि आता अंतिम सामन्यात विजय मिळवून जेतेपदही पटकावले आहे. सीएसकेच्या या यशात धोनीचे नेतृत्व आश्चर्यकारक होते. धोनीने चॅम्पियन होण्यासाठी प्रत्यक्षात तो मार्ग निवडला, जो बाकीचे ७ कर्णधार करू शकले नाहीत.

धोनीला यूएईच्या खेळपट्टीवर यश मिळाले, ते त्याच्या विचारसरणीमुळे. ज्या विचाराने त्याला संघाची पाठराखण करण्यास आणि एका फिरकीपटूला घेऊन मैदानात उतरण्यास प्रेरित केले. दुबई, अबू धाबी आणि शारजाहमधील खेळपट्ट्या ज्यावर बाकीचे संघ दुहेरी फिरकीच्या रणनीतीने मैदानात उतरत होते. धोनी त्याच खेळपट्ट्यांवर आपला डाव खेळत होता आणि यशाची बीजेही पेरली गेली.

भारतीय क्रिकेट संघाचा आणि आयपीएलमध्ये सर्वात लोकप्रिय फ्रँचायजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी निसर्गत: एक अजब रसायन आहे. जिथे जगभरातील इतर कर्णधार विचार करणे थांबवतात, तिथून धोनीचे विचारचक्र सुरू होते. त्याच्या तुफानी फटकेबाजी आणि चपळ यष्टीरक्षणासह त्याच्या नेतृत्वगुणांवरही कौतुकाचे इमले बांधले जातात. आयपीएल २०२० मध्ये पहिल्यांदाच प्ले-ऑफ मध्ये चेन्नईच्या संघाला स्थान मिळवता आले नाही. त्या नंतर एक वर्षाच्या कालावधीत त्याच संघाला जेतेपद मिळवून देण्याची किमया धोनीने करून दाखवली आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: