१८४ कोटींचे बेनामी संशयास्पद व्यवहार; सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा


हायलाइट्स:

  • १८४ कोटींची छुपी मिळकत
  • प्राप्तिकर विभागाच्या ७० ठिकाणी छापा
  • किरीट सोमय्यांचा पवारांवर निशाणा

मुंबईः प्राप्तिकर विभागाने मागील आठवड्यात पाच दिवस महाराष्ट्रासह अन्य तब्बल ७० ठिकाणी कसून तपास केला. त्यामध्ये १८४ कोटी रुपयांची छुपी मिळकत उघड झाली. पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांचा हा तपास होता, असे प्राप्तिकर विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. यावरुन भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी (kirit somaiya) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट करत खळबळजनक दावा केला आहे. सोमय्या यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी अजित पवार घोटाळा असा उल्लेख केला आहे. सोबत त्यांनी कारवाईबाबत माहिती देताना म्हटलं आहे की नऊ दिवसांचे आयकर छापे, मुंबई, पुणे, बारामती, गोवा, जयपूर ७० ठिकाणी छापे. १००० हून अधिक कोटींचे जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने कोट्यवधी रुपये रोख आणि ज्वेलरी. १८४ कोटींची बेनामी संशयास्पद व्यवहार, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

वाचाः आम्हाला आता उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी दिसू लागलेत; राणेंचा खोचक टोला

काय आहे प्रकरण?

प्राप्तिकर विभागाने प्रामुख्याने दोन रिअल इस्टेट उद्योगांचे कार्यालय, घरे व त्याच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे होते. मुंबई, पुणे, बारामती, गोवा व जयपूर येथे हा छापा टाकण्यात आला. यामध्ये छुपी मिळकत, बेनामी व्यवहार आदी मोठ्या प्रमाणात बाहेर आले असून, अशा बेनामी व्यवहारांचा आकडा १८४ कोटी रुपये होता. या दोन रिअल इस्टेट समूहाने बनावट भागीदारी प्रीमियम, संशयास्पद बेनामी कर्ज वितरण, सेवा न घेतलेल्या कामाच्या बनावट पावत्या, बनावट व्यवहार आदींद्वारे ही मिळकत लपविण्यात आली. या सर्व बेनामी मिळकतीत राज्यातील एका प्रभावशाली कुटुंबाचा समावेश आहे.

वाचाः १८४ कोटींची छुपी मिळकत; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यात धक्कादायक वास्तव उघड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: