साहेब… राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा विचार करा; चित्रा वाघ यांचा खोचक टोला


हायलाइट्स:

  • आरोग्य विभागाच्या २४ तारखेला होणाऱ्या परीक्षेचा पुन्हा घोळ
  • परीक्षेवरुन असलेल्या गोंधळावरुन विरोधकांचा सरकारवर निशाणा
  • भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबईः आरोग्य विभागाच्या २४ तारखेला होणाऱ्या परिक्षेचा पुन्हा एकदा गोंधळ झाला आहे. वेळापत्रकात एकाच दिवशी वेगवेगळ्या केंद्रावर वेगवेगळ्या जिल्ह्यात परीक्षा होणार असल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं होतं. ‘मी एका जबाबदारीने मुख्यमंत्रिपद स्वीकारलं आहे. केवळ वडिलांना दिलेल्या वचनामुळे हे पद मला स्वीकारावं लागलं आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, असे वचन मी बाळासाहेबांना दिले होते. त्यानुसार भाजपने शब्द पाळला असता व शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता तर कदाचित आज मी राजकीय जीवनातून बाजूलाही झालो असतो,’ असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील हाच धागा पकडत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे.

वाचाः ‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’

आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळाचा मुद्दा उपस्थित करत चित्रा वाघ यांनी ट्वीट केलं आहे. ‘मुख्यमंत्री कालच्या भाषणात गोंधळलेले दिसले. तीच परंपरा प्रशासनाने सुरू ठेवलीये. हे सरकार सलग दुसऱ्यांदा आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात नापास झालंय. सरकारी चुकीमुळं विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्यांना संधी पुन्हा द्यावी ही आमची मागणी आहे,’ असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

वाचाः १८४ कोटींचे बेनामी संशयास्पद व्यवहार; सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणा

‘मुख्यमंत्री काल म्हणालेत की मी मुख्यमंत्री बनून माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केलंय. दोनदा आरोग्य विभागाच्या परीक्षेत गोंधळ झालाय. साहेब राज्यातील विद्यार्थ्यांच्या वडिलांच्या स्वप्नांचा पण विचार करा ना,’ असा खोचक टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: