मॉस्को: रशियामध्ये
करोना महासाथीचा थैमान सुरूच असून बाधितांची आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. रशियात शनिवारी करोना महासाथीच्या आजारामुळे १००२ बाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. रशियात करोनामुळे एकाच दिवसात बळी गेलेल्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. रशियात आतापर्यंत दोन लाख २२ हजार ३१५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली.
रशियात मागील काही महिन्यांमध्ये करोना महासाथीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने बाधितांची संख्या वाढत आहे. रशियात आतापर्यंत ७९ लाखजणांना करोनाची लागण झाली आहे. युरोपीयन देशांमध्ये सर्वाधिक करोना बळींची संख्या रशियात नोंदवण्यात आली. लसीकरणाकडे नागरिक पाठ फिरवत असल्याने बाधितांची आणि करोना बळींची संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सौदी अरेबिया घेणार मोकळा श्वास; १८ महिन्यानंतर मास्क, सोशल डिस्टेंसिंगचे निर्बंध शिथील
‘या’ लशीची ब्लू प्रिंट चोरून रशियाने तयार केली ‘स्पुटनिक व्ही’ लस; ब्रिटनचा खळबळजनक दावा
करोनावरील उपचारासाठी औषधाला मान्यता देण्याची मागणी
रशियन नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याने लसीकरण मोहिम धीम्या गतीने सुरू आहे. रशियन नागरिकांमध्ये लशीबाबत संभ्रम, अविश्वासाचे वातावरण आहे. त्यामुळेच लसीकरणाकडे पाठ फिरवली जात आहे. रशियाकडून ‘स्पुटनिक व्ही’ ही लस जगातील इतर देशांना पाठवण्यात येत आहे. मात्र, रशियातच करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जगभरात करोनाबाधितांची संख्या २४ कोटी झाली आहे. तर, ४८.८ लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
Source link
Like this:
Like Loading...