पोलीस खात्याच्या उत्तम कामगिरीबद्दल सत्कार व अभिनंदन केलेच पाहिजे यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल – अजित प्रकाश संचेती

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार व अभिनंदन केलेच पाहिजे यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळेल – अजित प्रकाश संचेती,भारतीय राष्ट्रवादी पार्टी
 पुणे:-बिबवेवाडी पुण्यात एका कबड्डीपट्टू 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली होती . तीन तरुणांनी या मुलीवर कोयत्याने हल्ला चढवला होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली होती. 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बिबवेवाडी परिसरातील यश लॉन्स इथं ही घटना घडली. क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14, रा, अप्पर, बिबवेवाडी) असं मृत तरुणीचं नाव आहे . नूतन होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय सांगली शिकत होती. एकतर्फी प्रेमातून कबड्डीपटू मुलीचा खून झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणी बिबेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता . प्रचंड तणावाचे वातावरण असताना तेथील पीआय सौ अनिता हिरवकर मॅडम व गुन्हे शाखेची टीम बिबवेवाडी पोलीस ठाणे यांनी मोठ्या शिताफीने आरोपीना 12 तासात अटक केली होती. याबद्दल भारतीय राष्ट्रवादी पार्टी महाराष्ट्रचे महासचिव अजित संचेती,दीपक पिंपळे,नवनाथ गपाट, ओंकार यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या पीआय सौ अनिता हिरवकर व गुन्हे शाखेच्या टीम चा शाल व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत सत्कार केला आणि आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीचे निवेदन दिले.

अजित संचेती यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की पोलीसांबद्दल जनतेच्या मनात असलेली कटुता व पोलीस काही काम करत नाही ही भावना दूर व्हावी यासाठी आम्ही जे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे चांगले काम करतील अशा अधिकारी व त्यांच्या टीमचा सत्कार आणि अभिनंदन करणार आहे यामुळे जनतेच्या मनातली कटुता दूर होईल व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना अशामुळे अजून जोमाने काम करण्याची ओढ व प्रोत्साहन मिळेल .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: