‘जिमॅट’ परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुण मिळवून द्यायचे; सायबर पोलिसांनी असा उधळला कट


म. टा. प्रतिनिधी, पुणेः एमबीएच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘जिमॅट’ या पूर्व परिक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये घेऊन ऑनलाईन चांगले गुण मिळवून देणारे रॅकेट सायबर सेल पोलिसांनी उघडकीस आणले आहे. विद्यार्थ्याच्या परिक्षेच्या वेळी सॉफ्टवेअरच्या मदतीने कंम्प्युटरचा ताबा घेऊन दिल्ली येथील क्लास चालक ही परिक्षा देत होता. आतापर्यंत ३२ विद्यार्थ्यांकडून लाखो रूपये घेऊन त्यांनेच ही परिक्षा पास करून दिल्याचे तपासात समोर आले आहे.

अभय मिश्रा (वय २८, रा. मानगो, जमशेदपूर, झारखंड) याला अटक करण्यात आली आहे. तर, त्याचा मित्र व दिल्ली येथून परिक्षा देणारा क्लास चालक याचा पोलिस शोध घेत आहेत. मिश्रा याचे बिटेक झाले असून तो सरकारी कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याच्याकडून लॅपटॉप, मोबाईल, चार डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याला न्यायालयाने २२ ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचा आदेश दिला आहे, अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली.

वाचाः ‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’

पुण्यातील एका विद्यार्थ्याला एमबीएला प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे त्यान सोशल मिडीयवर जिमॅट परिक्षेबाबत शोध घेतला. त्यावेळी त्याला ‘जिमॅट जिआरई शॉर्टकट’ नावाचे इन्साग्रामवर प्रोफाईल दिसून आली. या ठिकाणी या परिक्षेत १०० टक्के चांगल्या गुण मिळवून देण्याची हमी देण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांने त्या ठिकाणी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. ते सांगतील तशी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार आरोपींनी विद्यार्थ्याला त्या कंम्प्युटरवर एक अॅप घेण्यास सांगितले. त्यानंतर कंम्प्युटरचा ताबा घेत विद्यार्थीच परिक्षा देत असल्याचे भासवून आरोपींनी परिक्षा दिली. त्यावेळी विद्यार्थ्याला ८०० पैकी ७७० गुण पडले. यासाठी आरोपींनी त्याच्याकडे चार लाख रूपयांची मागणी केली. हा सर्व फसवणुकीचा प्रकार असल्यामुळे विद्यार्थ्याने सायबर सेल पोलिसांकडे येऊन तक्रार दिली. या तक्रारीनुसार तांत्रिक विश्लेषण करून पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक डी. एस. हाके, मीनल सुपे पाटील यांच्या पथकाने झारखंड येथे जाऊन मिश्रा याला अटक केली. त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

वाचाः १८४ कोटींचे बेनामी संशयास्पद व्यवहार; सोमय्यांचा अजित पवारांवर निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: