साक्षीने २०१५ मध्ये मुलगी जीवाला दिला जन्म
साक्षीने २०१५ मध्ये त्यांची पहिली मुलगी जीवाला जन्म दिला. जेव्हा जीवाचा जन्म झाला होता, तेव्हा धोनी ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या विश्वचषकात संघाचे नेतृत्व करत होता. जीवाच्या जन्मानंतरही तो देशात परतला नाही. मुलीच्या जन्मानंतर सुमारे तीन महिन्यांनी त्याने आपल्या मुलीला पाहिले होते. जीवा अनेकदा तिच्या वडिलांना चिअर करण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. शुक्रवारी देखील अंतिम सामन्यादरम्यान, साक्षीसह जीवा सीएसके संघासाठी चीअर करण्यासाठी आली होती. या सामन्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये सामना जिंकल्यानंतर साक्षी धोनीला मैदानात मिठी मारताना दिसली. यावेळी जीवादेखील तिच्या पालकांसोबत विजय साजरा करताना दिसली.
धोनीने केले केकेआरचे कौतुक
अंतिम सामन्यातील विजयानंतर महेंद्रसिंह धोनीने केकेआरच्या संघाचे जोरदार कौतुक केले. तो म्हणाला, ‘कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी या हंगामात ज्याप्रकारे कामगिरी केली, ती नक्कीच कौतुकास्पद आहे. हंगामाच्या पूर्वार्धात केकेआरला ७ पैकी फक्त २ सामने जिंकता आले. अशा स्थितीत उत्तरार्धात इतके सामने जिंकणे आणि अंतिम फेरीत स्थान मिळवणे, ही एक उत्तम कामगिरी म्हणता येईल. यासाठी त्यांच्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफचे कौतुक केले पाहिजे. ते खरोखरच जिंकण्यासाठी पात्र होते.