Sonia Gandhi: माझ्याशी मीडियाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही, सोनियांनी ‘जी २३’ला सुनावलं


हायलाइट्स:

  • एकजूट राहण्याची गरज : सोनिया गांधी
  • ‘चार भिंतीच्या बाहेर जी गोष्ट जाईल तो सीडब्ल्यूसीचा सामूहिक निर्णय असायला हवा’
  • जी २३ नेत्यांना त्यांनी समजुतदारपणाचा सल्ला

नवी दिल्ली : काँग्रेस कार्यकारी समितीची एक बैठक आज (शनिवारी) पार पडतेय. या बैठकीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांचा ‘जी २३’ गटाला आपल्या निशाण्यावर घेतलंय. मी काँग्रेसची पूर्णकालीन आणि सक्रीय अध्यक्ष आहे. माझ्याशी मीडियाच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही, अशा शब्दांत सोनियांनी पक्षातील विरोधकांना तंबी दिलीय. तसंच सोनियांनी एकजूट आणि अनुशासित राहण्याची गरजही पक्ष नेत्यांसमोर व्यक्त केली.

‘मोकळी आणि प्रामाणिक चर्चा’

‘मी नेहमीच स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलंय. माझ्याशी मीडियाद्वारे बोलण्याची आवश्यकत नाही. यासाठीच आपण सर्वच इथे मोकळेपणाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करत आहोत. परंतु, चार भिंतीच्या बाहेर जी गोष्ट जाईल ती काँग्रेस कार्यकारी समितीचा सामूहिक निर्णय असायला हवा’ असं म्हणत जी २३ नेत्यांना त्यांनी समजुतदारपणाचा सल्ला दिलाय.

तरुण नेतृत्वाची दखल

तुम्ही मला बोलण्याची परवानगी दिली तर मी पक्षाची पूर्णकालीन आणि सक्रीय अध्यक्ष आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक सहकाऱ्यांनी आणि विशेषत: तरुण नेत्यांनी नेतृत्वाची जबाबदारी घेतलीय, असं म्हणत सोनिया यांनी पक्षातील तरुण नेतृत्वाची दखल घेतलीय.

Manmohan Singh: माजी पंतप्रधानांच्या भेटीचा ‘किळसवाणा पीआर स्टंट’, काँग्रेसची आरोग्यमंत्र्यांवर टीका
navjot singh sidhu : ‘राहुल-सिद्धू ‘बल्ले बल्ले’; प्रदेशाध्यपदी कायम….
काँग्रेस नव्या पक्षाध्यक्षाची निवड

काँग्रेस अध्यक्ष निवडीची प्रकिया ३० जूनपर्यंत पूर्ण होणार होती. परंतु, करोना संक्रमणामुळे ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली. लवकरच या नव्या प्रक्रियेची रुपरेषा सादर केली जाईल, असंही या बैठकीत सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलंय.

आगामी निवडणुका

उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये आगामी वर्षात होणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात झालीय. काँग्रेस मजबूत पक्ष व्हावा, अशी संघटनेची इच्छा आहे. यासाठी पक्षाचं हित सर्वोच्च स्थानावर ठेवून एकत्रित राहण्याची गरज आहे. यासाठी आत्मनियंत्रण आणि अनुशासनाची आवश्यकता आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं.

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांच्यासहीत जी २३ समुहाच्या नेत्यांकडून काही दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती. तसंच गेल्या काही महिन्यांत अनेक नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज पार पडतेय.

Madhya Pradesh: भाचीला कन्यारत्न, पेट्रोल पंप मालकाची ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर
Chhattisgarh: रायपूर रेल्वे स्टेशनवर स्फोट, सीआरपीएफचे सहा जवान गंभीर जखमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: