घर खरेदी करण्यासाठी मुंबई आनंदी शहर आहे का? वाचा कुठलं शहर आहे सगळ्यात टॉपवर


मुंबई : जिथे तुम्ही संपूर्ण आयुष्य आनंदाने घालवू शकाल अशा ठिकाणी घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यूकेच्या ऑनलाइन मॉर्गेज सल्लागाराने केलेल्या नवीन अभ्यासात भारतातील शहरांशी संबंधित बरीच महत्त्वाची माहिती समोर आली आहे. घर खरेदी करण्याच्या दृष्टीने जगभरातील सर्वात आनंदी शहरांवर हा अभ्यास करण्यात आला आहे. यामध्ये घर खरेदी करण्यासाठी जगातील २० आनंदी शहरांपैकी भारतातील पाच शहरांची निवड करण्यात आली आहे. यामुळे आपली मुंबई कोणत्या स्थानावर आहे, तुम्हीच पाहा…

या खास अहवालानुसार, चंदिगड हे पहिल्या क्रमांकावर आहे. घर खरेदीसाठी मुंबईला जगातील सर्वात कमी आनंदी शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर या यादीत सुरतला पाचवे स्थान मिळाले आहे. स्पेनमधील बार्सिलोना हे घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात आनंदी शहर असल्याचे आढळले. त्याचबरोबर इटलीची फ्लोरेंस दुसऱ्या क्रमांकावर आणि दक्षिण कोरियाचे उल्सान शहर तिसऱ्या क्रमांकावर आहे. हजारो इन्स्टाग्राम पोस्ट्स आणि लोकेशन्सनुसार ही आनंदी शहरांची यादी तयार करण्यात आली आहे.

‘दसरा मेळाव्यात बाळासाहेबांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची, आता…’
मुंबईचा हॅपीनेस स्कोअर सर्वात कमी

अभ्यासानुसार, घर खरेदी करण्यासाठी मुंबई हे जगातील सर्वात कमी आनंदी शहर आहे. मुंबईसाठी सरासरी हॅपीनेस स्कोअर १०० पैकी ६८.४ आहे. घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी आनंदी शहरांच्या यादीत अमेरिकेतील अटलांटा आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. मुंबई व्यतिरिक्त भारतातील सुरत शहर हे जगातील सर्वात कमी आनंदी शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

बार्सिलोना संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर

अभ्यासात बार्सिलोनामधील घर खरेदीदारांचा सरासरी हॅपीनेस स्कोअर १०० पैकी ९५.४ असल्याचे दिसून आले, जे घर खरेदीदारांच्या जागतिक हॅपीनेस स्कोअरपेक्षा १५.६ % जास्त आहे. घर खरेदी करण्यासाठी चंदीगड हे भारतातील सर्वात आनंदी शहर असल्याचे दिसून आले, जे या जागतिक यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताच्या उर्वरित २० शहरांमध्ये जयपूर १० व्या स्थानावर, चेन्नई १३ व्या स्थानावर आणि इंदूर आणि लखनौ अनुक्रमे १७ व्या आणि २० व्या स्थानावर आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: