आम्हाला आता उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी दिसू लागलेत; राणेंचा खोचक टोला


हायलाइट्स:

  • दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांची भाजपवर टीका
  • भाजप आणि केंद्र सरकारवर सोडले टीकेचे बाण.
  • भाजप आमदार नितेश राणेंची मुख्यमंत्र्यावर टीका

मुंबईः मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेना दसरा (shivsena dasara melava 2021) मेळाव्यात केलेल्या भाषणावरुन भाजपकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे.

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जवळपास तासभर भाषण केले. यात हिंदुत्व, ड्रग्ज प्रकरण, लखीमपूर हिंसाचार या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच, भाजपवरही जोरदार टीका केली. हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हानच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणावरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. आमदार नितेश राणे यांनीही एक ट्वीट करत मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

वाचा: मराठी अमराठी भेद करू नका!; उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्वावर मोठं विधान

नितेश राणे ट्वीटमध्ये म्हणतात, दसरा मेळाव्यातील भाषणानंतर आता आम्हाला उद्धव ठाकरेंमध्ये राहुल गांधी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. यामध्ये कोणतीही शंका उरलेली नाही, असं खोचक ट्वीट नितेश राणेंनी केलं आहे. आता नितेश राणेंच्या या ट्वीटवर शिवसैनिक काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय.

वाचा: तर राजकारणातून बाहेर पडलो असतो!; उद्धव ठाकरे फडणवीसांना काय म्हणाले?

मुख्यमंत्री भाषणात काय म्हणाले?

कोणाच्याही कुटुंबावर, वैयक्तिक तसेच पत्नी-मुलांवर खोटे आरोप करणे हे हिंदुत्व नाही. याला नामर्द म्हणतात’, या शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर हल्ला चढवला. ‘लपून हल्ले करणारे तुम्ही षंढ आहात’, असेही ते म्हणाले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सीबीआय, ईडी यासारख्या तपास यंत्रणांचे छापासत्र सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात टीका केली. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने देशात अमृतमंथन व्हायलाच पाहिजे. महिला अत्याचार तसेच संघराज्यावर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी. राष्ट्रीय आणीबाणी, परकीय आक्रमण आणि विदेशी संबंध या तीन गोष्टी सोडल्या तर राज्यांच्या अधिकारांमध्ये ढवळाढवळ करणे हे घटनाबाह्य ठरेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

वाचा: महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणणाऱ्या भाजपला ठाकरेंचा ‘हा’ सवाल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: