परभणी : राज्यात काही झालं तरी महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. वारंवार समोर येणाऱ्या महिला अत्याचारामुळे आता कुठेही महिला सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरात २१ वर्षीय विवाहित महिलेवर ३५ वर्षीय तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
८ मे २०२१ रोजी दुपारी तीन वाजता २२ जुलै २०२१ या दरम्यान जबरीने संबंध केल्याचा पीडितिने दिलेल्या फिर्यादीत उल्लेख केला आहे. दरम्याम, गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपी रोहीत पंडीत यांच्या विरोधात कलम ३७६, ५०४ आणि ५०६ नुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षका वसुंधरा बोरगावकर या करत आहेत.