दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामातील फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून चेन्नई सुपर किंग्जला प्रथम फलंदाज करण्याचे आमंत्रण दिले. चेन्नईच्या डावाची सुरूवात सलामीवीर युवा फलंदाज
ऋतुराज गायकवाड आणि अनुभवी फाफ डुप्लेसिस यांनी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची भागिदारी केली. ऋतुराज ३२ धावांवर बाद झाला. या खेळीत त्याने आयपीएलच्या इतिहासातील एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला.
केकेआरविरुद्धच्या फायनल मॅच आधी ऋतुराजने या हंगामात ६०३ धावा केल्या होत्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या मागे होता. राहुलने या हंगामात ६२७ धावा केल्या आहेत. पण ऋतुराजने या सामन्यात ३२ धावा करत राहुलला मागे टाकले आणि ऑरेंज कॅप स्वत:च्या नावावर केली. आता या हंगामात ऋतुराजला मागे टाकण्याची शक्यात फार कमी आहे. एकच फलंदाज आहे जो त्याला मागे टाकू शकतो. तो म्हणजे चेन्नईचा दुसरा सलामीवीर फाफ डुप्लेसीस होय. त्याच्या आतापर्यंत ५५७ धावा केल्या आहेत. अद्याप मैदानावर असलेल्या फाफने मोठी खेळी केली तर ऋतुराज मागे पडू शकतो.
सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याबरोबर ऋतुराजच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम होऊ शकतो. तर फाफने त्याला मागे टाकेल नाही तर सर्वात लहान वयात ऑरेंज कॅप मिळवणारा तो खेळाडू होऊ शकतो. सध्या हा विक्रम पंजाब किंग्जचा माजी सलामीवीर शॉन मार्गच्या नावावर आहे. त्याने २५व्या वर्षी २००८ साली ६१६ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली होती. गायकवाडने आता ६३५ धावा केल्या असून तो २४ वर्षाचा आहे.
Source link
Like this:
Like Loading...