Afghanistan Blast: अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटानं हादरलं; ३२ ठार तर ४० हून अधिक जखमी


हायलाइट्स:

  • जुम्याच्या नमाजासाठी मशिदीत सामान्य नागरिक उपस्थित होते
  • अल्पसंख्यांक शिया समुदायाशी संबंधित नागरिक स्फोटाचे बळी ठरले
  • हा स्फोट नेमका कुणी घडवून आणला, हे अद्याप स्पष्ट नाही

कंदहार : अफगाणिस्तानावर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर हिंसाचारात वाढ झाल्याचं दिसून येतंय. शुक्रवारी अफगाणिस्तान पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरलंय. कंदहार प्रांतातील एका मशिदीत मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला.

स्थानिक वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कंदहारच्या एका मशिदीत आज सकाळी झालेल्या या बॉम्बस्फोटात ३२ जण ठार झाले आहेत तर या स्फोटातील जखमींची संख्या ४० हून अधिक आहे.

पाकिस्तानच्या ‘लुटी’वर तालिबानचा आक्षेप; पाककडून विमानसेवा स्थगित
बांगलादेशात हिंदू मंदिरांवर धर्मांधांचा हल्ला; पंतप्रधानांकडून निषेध, कठोर कारवाईचे आश्वासन
तालिबानच्या एका प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, जुम्याच्या नमाजादरम्यान दक्षिण अफगाणिस्तानातील एका मशिदीत हा स्फोट घडवून आणण्यात आला. यामध्ये सामान्य नागरिक नमाजासाठी जमले होते.

या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आलेली नाही. मात्र, मशिदीत अल्पसंख्यांक शिया समुदायाशी संबंधित नागरिक येतात. इस्लामिक स्टेट समुहांद्वारे हे नागरिक टार्गेट करण्यात येतात.

गेल्याच आठवड्यात अफगाणिस्तानातील उत्तर प्रांतातील कुंदुजमध्ये एका शिया मशिदीला आत्मघातकी स्फोट घडवून आणण्यात आला होता. या स्फोटात १०० हून अधिक जण ठार झाले होते. या स्फोटाची जबाबदारी ‘इसिस‘ या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली होती.

Bill Clinton: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन रुग्णालयात दाखल
चिंताजनक! जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण, पाकिस्तान, बांगलादेशनंतर क्रमांक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: