सणासुदीच्या खर्चावर बचतीची संधी ; एयू बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर सवलती


हायलाइट्स:

  • एयू बँकेची फेस्टिव्ह डील्स केवळ एयू बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डवर उपलब्ध
  • कार कर्ज आणि गृह कर्जावर आकर्षक व्याजदर
  • गोल्ड लोनच्या प्रक्रिया शुल्कावर १०० टक्के सवलत

मुंबई : एयू स्मॉल फायनान्स बँक या भारताच्या स्मॉल बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने ग्राहकांसाठी फेस्टिव्ह ऑफर जाहीर केली आहे. एयू शॉपिंग धमाका ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू झाला असून ७ नोव्हेंबर २०२१ रोजी संपणार आहे. यात ५०० पेक्षा अधिक ब्रँड्सवरील ऑफर्ससह एयू बँकेने खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स, पर्यटन, डायनिंग, स्वास्थ्य अशा विविध क्षेत्रांतील आघाडीच्या ब्रँड्सशी भागिदारी केली आहे.

सोने ७०० रुपयांनी महागले ;दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोने झळाळले, जाणून घ्या आजचा भाव
त्यामुळे एयू बँक क्रेडिट व डेबिट कार्डवर कॅशबॅक तसेच इतर सवलती मिळतील. या ऑफर्स अमेझॉन, मिंत्रा, यात्रा, मेकमायट्रीप, जिओमार्ट, डॉमिनोज, ओला, बिगबास्केट, ऑप्पो, रियलमी, क्रोमा, ईझीडायनर इत्यादी ब्रँड्सवर उपलब्ध असतील तसेच ७०० पेक्षा जास्त स्थानिक व्यापाऱ्यांशी करारही करण्यात आले आहेत.

तरुणाई बिटकॉइन, OTT च्या आहारी; सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता, केली ही मागणी
महिनाभर चालणार असलेल्या या खरेदी महोत्सवात मर्यादित काळासाठीच्या कर्ज योजना उदा. गोल्ड लोन वरील प्रक्रिया शुल्कात १०० टक्के सवलत (२ लाख आणि त्या पुढील कर्जरकमेवर) आणि शेती कर्जावरील प्रक्रियाशुल्कात ०.२० टक्के, सुरक्षित व्यावसायिक कर्जांवर ०.५० टक्के आणि वाहन कर्जावर ५० टक्के सवलत इत्यादींचा समावेश आहे. या फेस्टिव्ह ऑफरमध्ये गृह आणि कार कर्जावरही आकर्षक व्याजदर दिले जाणार आहेत.

वैयक्तिक कर्ज घेताय ; ‘या’ कंपनीने सुरु केलं डिजीटल कर्ज, फोनवर होणार उपलब्ध
एयू शॉपिंग धमाकाच्या तिसऱ्या आवृत्तीच्या लाँचविषयी एयू बँकेचे कार्यकारी संचालक उत्तम टिबरेवाल म्हणाले, ‘आम्ही यापूर्वी आयोजित केलेल्या शॉपिंग धमाकालाही चांगला प्रतिसाद मिळाला होता. ब्रँड भागिदारांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील खरेदी वाढल्याचे व त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता आल्याचे सांगितले. दुर्गम भागातील अस्तित्व विस्तारल्याचा लाभ केवळ आम्हालाच नाही, तर आमच्या व्यावसायिक भागिदारांनाही झाला.

एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या क्रेडिट कार्ड व्यवसायाचे प्रमुख मयंक मार्कंडेय म्हणाले, ‘यावर्षीचा एयू शॉपिंग धमाका जास्त खास आहे, कारण आम्ही नुकतेच आमच्या मौल्यवान ग्राहकांसाठी एयू बँक क्रेडिट कार्ड लाँच केले. एयू बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी ही पहिलीच फेस्टिव्ह ऑफर आहे आणि ती अधिक खास करण्यासाठी आम्ही भरपूर आकर्षक योजना आखल्या आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: