car rammed in jashpur chhattisgarh : भयंकर! छत्तीसगडमध्ये लखीमपूर पॅटर्न? कारने अनेकांना चिरडलं; ४ जण ठार


जशपूरः उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी जिल्ह्यात ३ ऑक्टोबरला कारने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. आता अशीच घटना छत्तीसगडच्या जशपूरमध्ये घडली आहे. एका भरधाव कारने चिरडल्याने ४ जण ठार झाले असून २० हून अधिक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय.

छत्तीसगडमधील जशपूर येथे ही भयंकर घटना घडली आहे. रस्त्यावरून एक धार्मिक मिरवणूक जात होती. दुर्गा विसर्जनाची ही मिरवणूक होती. यावेळी अचानक एक भरधाव आली मिरवणुकीत घुसली. या कारखाली अनेक जण चिरडले गेले आहेत. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण जखमी आहेत. या घटनेनंतर परिस्थिती हाथाबाहेर गेली आणि संतप्त भाविकांनी जाळपोळ केली. यामुळे शहरात तणाव आहे. मिरवणुकीतील संतप्त भाविकांनी कार पेटवून दिली आहे. करान चिरडणाऱ्या आरोपी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

murder at singhu border : सिंघू सीमेवरील निर्घृण हत्येशी आमचा काहीही संबंध नाही, संयुक्त किसान मोर्चाचा दावा

संतप्त नागरिकांनी पोलिसांना घेरलं. तसंच घोषणाबाजी सुरू केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संतप्त नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सिंघू सीमेवर जमावाकडून हत्या : कोण होता लखबीर सिंह? जाणून घ्या…

कशी घडली घटना?

दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी उत्सवाचं वातावरण होतं. अचानक मागून लाल रंगाची एक भरधाव कार मिरवणुकीत घुसली आणि अनेकांना चिरडून गेली. नागरिकांची गर्दी पाहून कार चालकाने गाडी का थांबवली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारमध्ये अंमली पदार्थ असल्याने वाहन चालकाने ती थांबवली नाही. चालकाने कार थांबवली असती तर तो अंमली पदार्थांप्रकरणी पकडला गेला असता, असं बोललं जातंय.

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. या अपघाताची जबाबदारी घेत राज्याच्या गृहमंत्र्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, असंही ते म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: