ई-फायलिंगला प्रतिसाद; दोन कोटींहून अधिक विवरणपत्रे सादर, जाणून घ्या नवीन डेडलाईन


हायलाइट्स:

  • ई-फाईलिंग करणाऱ्या करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
  • या पोर्टलवरुन आतापर्यंत दोन कोटींहून अधिक विवरणपत्रे सादर करण्यात आली.
  • केंद्र सरकारने प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत २०२१ पर्यंत वाढवली.

नवी दिल्ली : संदोष तंत्रज्ञानाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्राप्तिकर विभागाचे ई-फाईलिंग पोर्टल आता सुरळीत सुरु आहे. विवरणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली असली तरी ई-फाईलिंग करणाऱ्या करदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पोर्टलवरुन आतापर्यंत दोन कोटींहून अधिक विवरणपत्रे सादर करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

केंद्र सरकारने प्राप्तीकर परतावा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत ( govt extends itr filing deadline ) वाढवली होती. करोना संसर्गामुळे आधी सरकारने आयकर भरण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती.

सोने ७०० रुपयांनी महागले ;दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोने झळाळले, जाणून घ्या आजचा भाव
प्राप्तिकर विभागाचे ई-फाईलिंग पोर्टल (www.incometax.gov.in) च्या माध्यमातून १३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत दोन कोटी प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल करण्यात आली आहेत. या नव्या पोर्टलची सुरुवात, सात जून २०२१ ला झाली होती. सुरुवातीला करदात्यांना या पोर्टलवर विवरणपत्रे भरतांना अनेक अडचणी आणि त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पोर्टलवर येत असलेले अनेक तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले असून आता पोर्टलचे कार्यान्वयन सुरळीत सुरु झाले आहे.

गोल्ड लोन झालं स्वस्त ; सार्वजनिक क्षेत्रातील या बँंकेने सणासुदीला कमी केला व्याजदर
सरकारने दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत १३.४४ कोटींपेक्षा अधिक करदात्यांनी या पोर्टलवर लॉग इन केले आहे. साधारणपणे, ५४.७० लाख करदात्यांना ‘फरगॉट पासवर्ड’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती, जिच्या माध्यमातून त्यांना आपले पासवर्ड मिळवता आले आहेत.

मुकेश अंबानींची टॉप-१० मध्ये झेप ; वॉरेन बफे यांना टाकलं मागे, केला नवा विक्रम
सर्व प्राप्तिकर विवरणपत्रे ई-फायलिंगसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी आतापर्यंत दोन कोटींपेक्षा अधिक लोकांनी आतापर्यंत प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) भरली आहेत. यात सुमारे ८६ टक्के आयटीआर I आणि IV फॉर्म्स आहेत. यापैकी १.७० कोटी आयटीआरची पडताळणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी १.४९ कोटी आयटीआरची पडताळणी, आधार ओटीपीच्या माध्यामतून करण्यात आली आहे. आधार ओटीपी आणि इतर पद्धती केलेली पडताळणी प्राप्तिकर विभागासाठी महत्वाची आहे, कारण त्याच्याच माध्यमातून करपरतावेही दिले जातात. ज्या करदात्यांनी आतापर्यंत २०२१-२२ ची करविवरण पत्रे भरली नाहीत, त्यांनी ती भरावीत, असे आवाहन प्राप्तिकर विभागाने केले आहे.

२ महिन्यात एक हजारचे झाले ३४ लाख; तुमच्याकडे आहे का ‘हा’ क्रिप्टो कॉईन
दरम्यान, प्राप्तिकर विभागाचे नवे संकेतस्थळ विकसित करणे, देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थापनासाठी इन्फोसिसला जवळपास ४२४१.९७ कोटींचे कंत्राट १६ जानेवारी २०१९ मध्ये देण्यात आले आहे. आठ वर्षांसाठी हे कंत्राट देण्यात आले आहे. त्यापैकी १६४.५ कोटी कंपनीला अदा करण्यात आले आहेत. मात्र जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ होऊन देखील वेबसाईटवरील तांत्रिक दोष दूर झालेले नाहीत. यामुळे सुरवातीच्या काळात आयकरदात्यांसाठी नवीन वेबसाईट डोकेदुखी ठरत होती. करदात्यांना आॅनलाइन विवरण सादर करताना वेबपोर्टलवर भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फोसिस कंपनीला १५ सप्टेंबर २०२१ पर्यंतची मुदत दिली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: