Body found at Singhu border : तरुणाची निर्घृण हत्या; ‘शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली अराजकता पसरवणारे हे कोण?’


नवी दिल्लीः दिल्ली-हरयाणाच्या सिंघू सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुख्य मंचाजवळ लटकलेला आढळला. ही घटना उघड झाल्यानंतर भाजपने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट करून शेतकरी नेते राकेश टिकैत आणि आंदोलक शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे.

‘बलात्कार, हत्या, शरीरविक्रय व्यवसाय, हिंसा आणि अराजकता … हे सर्व शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली घडले आहे. आता हरयाणाच्या सीमेवर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हे काय चालले आहे? शेतकरी चळवळीच्या नावाखाली ही अराजकता करणारे हे कोण आहेत, जे शेतकऱ्यांना बदनाम करत आहेत?’, असा सवाल अमित मालवीय यांनी केला आहे.

‘राकेश टिकैतने लखीमपूरमध्ये मॉब लिंचिंगचे समर्थन केले नसते, तर हरयाणाच्या सीमेवर एका तरुणाची हत्या झाली नसती. शेतकर्‍यांच्या नावाने होणाऱ्या या आंदोलनांच्या मागे असलेल्या अराजकवाद्यांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे, असं मालवीय यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनीही ट्विट करून आंदोलक शेतकऱ्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘जो आपल्या जीवलगांची निर्घृण हत्या करतो तो शेतकरी कसा काय असू शकतो? शेतकरी तिरंग्याचा अपमान कसा करू शकतो? जो बहिणींवर बलात्कार करतो तो शेतकरी कसा असू शकतो? जे पोलिसांना धमकावतात बक्कल उखडून टाकेन, ते शेतकरी कसे? सामान्यांना काय त्रास देणारे ते शेतकरी के? देशाच्या अखंडतेवर हल्ला करणारा शेतकरी कसा काय असू शकतो?, असे प्रश्न भाटिया यांनी केले आहेत.

Singhu Border: हात-पाय कापून व्यक्तीची निर्घृण हत्या, शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी मृतदेह टांगला

काय आहे संपूर्ण प्रकरण

दिल्ली-हरयणाच्या सीमेवर शुक्रवारी सकाळी एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह सिंघू सीमेवर बॅरिकेडवरून लटकलेला आढळला. आंदोलकांच्या मुख्य व्यासपीठाजवळ युवकाचा मृतदेह सापडला. निहंगांवर हत्येचा आरोप होत आहे. तरुणाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आहेत. तरुणाच्या हत्येनंतर आंदोलक संतप्त आहेत. घटनास्थळी गर्दी जमली आहे. संतप्त जमाव पोलिसांना घटनास्थळाजवळ जाऊ देत नाही.

lakhimpur kheri : लखीमपूरमध्ये काय घडलं त्या दिवशी? आरोपी मंत्रिपुत्राला घेऊन SIT घटनास्थळी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: