रामदास कदम शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला जाणार नाहीत, कारण…


हायलाइट्स:

  • मुंबईत आज शिवसेनेचा दसरा मेळावा
  • शिवसेना नेते रामदास कदम अनुपस्थित राहणार
  • उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडं महाराष्ट्राचं लक्ष

मुंबई: राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजपच्या नेत्यांना रसद पुरवल्याच्या आरोपांमुळं वादात अडकलेले शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी आजच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. प्रकृती अस्वास्थ्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तसं पत्रही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयावरून वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. (Ramdas Kadam to not attend Shiv Sena’s Dussehra Rally)

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. हे आरोप करण्यासाठी शिवसेनेच्याच एका नेत्यानं त्यांना माहिती पुरवल्याचा आरोप झाला होता. ते नेते रामदास कदम असल्याची चर्चा होती. मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी थेट नाव घेऊन तसा आरोप केला. त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते प्रसाद कर्वे व रामदास कदम यांच्यातील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामुळं कदम यांच्यावरचा संशय बळावला. या संपूर्ण घडामोडींमुळं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कमालीचे नाराज झाल्याची चर्चा आहे. रामदास कदम यांना दसरा मेळाव्यात प्रवेश दिला जाणार नसल्याचीही चर्चा होती. अधिकृतरित्या मात्र कोणीही काही सांगण्यास तयार नव्हते. त्यामुळं रामदास कदम मेळाव्याला उपस्थित राहणार का, याबद्दल उत्सुकता होती. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

वाचा: ‘पवारांनी लायसन्स नसलेल्या ड्रायव्हरला थेट व्होल्वो बस चालवायला दिली’

प्रकृती अस्वास्थ्यामुळं मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं खुद्द रामदास कदम यांनी सांगितलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून रामदास कदम हे आजारी आहेत. मधल्या काळात त्यांना रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. तसंच, दोन महिने त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळं त्यांनी दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं. अर्थात, त्यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

‘त्या’ प्रसंगाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी?

काही वर्षांपूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या क्षमतेबद्दल जाहीर वक्तव्य केलं होतं. त्यामुळं शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्याचा फटका मनोहर जोशींना बसला होता. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात मनोहर जोशी व्यासपीठावर येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती. जोशींच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. शिवसैनिकांच्या रोषामुळं शेवटी मनोहर जोशी यांना मेळावा सोडून घरी परतावं लागलं होतं. त्या राड्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कदम यांनी हा निर्णय घेतला असावा, असंही बोललं जात आहे.

वाचा: अजून तरी देशानं लाज सोडलेली नाही, २०२४ मध्ये ते दिसेल; राऊतांचा भिडेंना टोला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: