पिंपरीत आठ वर्षीय मुलाची निर्घण हत्या, डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला अन् मृतदेह…
पिंपरी चिंचवड : पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच चाललं आहे. अशात खुनाचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडमधील चिखलीत एका आठ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
अखेर रात्री उशिरा घराच्या जवळच मुलाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून चिमुरड्याची हत्या झाल्याने कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान, कोणी अज्ञात व्यक्तीने ही हत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून मुलाची हत्या का करण्यात आली? याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.