वाळूमाफियांची हुशारी…पावती दोन ब्रास वाळूची अन् वाहतूक..!


परभणी: गंगाखेड तालुक्यातील दुसलगाव वाळू धक्क्यावरून दोन ब्रास वाळूची पावती घेऊन चार ब्रास वाळूची डंपरद्वारे वाहतूक करणाऱ्या चालकास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोड यांनी पकडले आहे. याप्रकरणी चालक व मालकाविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्रास पणे असा प्रकार सुरू असतानाही महसूल प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. हा वाळू उपसा थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने मागील काही दिवसांत तालुक्यातील काही वाळू धक्क्यांचे लिलाव केले आहेत. त्यामुळे वाळूचा होणारा अवैध उपसा आटोक्यात येईल असे वाटत होते. मात्र, तालुक्यातील दुसलगाव येथील वाळू धक्क्यावरून दोन ब्रास वाळूची पावती घेऊन चार ब्रासची वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर (एम.एच.२७ बि.एक्स ११७३) चा चालक सुरेश मारुती इंगळे यास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांनी गंगाखेड-परभणी या राष्ट्रीय महामार्गावरील खळी पुलावर पकडले. त्यानंतर गंगाखेड पोलीस ठाणे परिसरात लावण्यात आला.

१० हजारांच्या बजेटमधील ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टफोन्स, बॅटरी-कॅमेरा-डिस्प्ले दमदार; पाहा लिस्ट
किती लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला?…

उपविभागीय पोलीस अधिकारी शिरतोड यांना पावतीवरील वेळ व दिनांकाचा संशय आल्याने त्यांनी तहसीलदार यांच्याकडून पावतीचा अहवाल मागविला. मात्र तो अहवाल मिळाला नाही. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मिर्झा शमशाद बेग मुस्तफा यांच्या तक्रारीवरून हायवा चालक सुरेश मारोती इंगळे, डंपर मालक काबू दनवटे (रा. दोघे महातपुरी) या दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत वाळूसह २५ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मोठी बातमी : लखीमपूर खिरी प्रकरणात केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाला दणका; सुप्रीम कोर्टाने रद्द केला जामीन
या अगोदरही झाली होती तक्रार…

गंगाखेड तालुक्यातील झोला येथील वाळू घाटावरून जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा होत असल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. कारवाईच्या लेखी आश्वासनानंतर सदरील उपोषण मागे घेण्यात आले होते. अवैध वाळू उपसा चे प्रकार सर्रासपणे घडत असताना महसूल प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे.

IPL २०२२ मध्ये टाकला सर्वात धोकादायक यॉर्कर; फलंदाजाची बॅट तुटलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.