IPL 2021 Final Playing xi prediction: मेगा फायनलमध्ये धोनी धोका घेणार नाही; या खेळाडूला देणार संधी


दुबई: आयपीएलच्या १४व्या हंगामाचा विजेता आज रात्री ठरणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज साडे सात वाजता फायनल मॅच होणार आहे. चेन्नईला ३ विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार धोनीची ही अखेरची मॅच देखील असू शकते. त्यामुळे चेन्नईचा संघ आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करून विजेतेपदासह संघाल निरोप देण्यास उत्सुक असेल. जाणून घेऊयात फायनल मॅचसाठी धोनीची प्लेईंग इलेव्हन कशी असेल ते…

आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला ऋतुराज गायकवाड (६०३ धावा) आणि फाफ डु प्लेसिस (५४७ धावा) या जोडीने चांगली सुरुवात करून दिली आहे. या दोन्ही सलामीवीरांनी स्पर्धेत प्रत्येकी ५०० हून अधिक धावा केल्या आहेत. अंतिम सामन्यात देखील या दोघांकडून अशीच सुरूवात अपेक्षित असेल. ऋतुराज गायकवाडला सर्वाधिक धावांसह ऑरेंज कॅप मिळवण्याची संधी आहे. मधल्या फळीत गेल्या सामन्यात रॉबिन उथप्पाने दिल्लीविरुद्ध धमाकेदार अर्धशतक झळकावले होते. चेन्नईसाठी मधळ्या फळीत मोईन अली आणि अंबाती रायडू यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सुरेश रैना या मोठ्या सामन्यात सामन्यात संघात परत येण्याची शक्यता कमी आहे. उथप्पाच्या जागी त्याला संधी देण्याचा धोका धोनी घेणार नाही.

चेन्नई संघाचा मुख्य आधार आहे तो कर्णधार धोनी. विकेटकीपर बरोबरच संपूर्ण सामन्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम तो करत असतो. गेल्या सामन्यात त्याने ६ चेंडूत १८ धावा करत पुन्हा एकदा उत्तम फिनिशर असल्याचे दाखवून दिले आहे.

गोलंदाजीत चेन्नईकडे ड्वेन ब्रावो, मोईन अली, जोश हेजलवुड असे अनुभवी गोलंदाज आहेत. त्याच बरोबर दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर सारखे गोलंदाज मोक्याच्या क्षणी विकेट घेऊ शकतात.

फायनल मॅचसाठी चेन्नई सुपर किंग्जचा संभाव्य संघ
फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा अथवा सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार), रविंद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जोश हेजलवुडSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: