‘महाविकास आघाडीच्या दहा तोंडी रावणाचा अहंकारही महाराष्ट्रातील जनताच मोडेल’


मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजप असा एक वेगळा वाद पाहायला मिळाला. यावरून वारंवार दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीकास्त्र सुरू असतात. अशात सामनाच्या अग्रलेखामधून भाजपवर घणाघाती टीका केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून वाघ मेंढराच्या कळपात शिरल्यावर जशी व्यवस्था होते तसं भाजपचं झालं असल्याचं सामनाच्या अग्रलेखातून लिहण्यात आलं होतं. यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करून शिवसेनेला सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वतःला वाघ म्हणवणारे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कळपात घुसून कधी शेळी झाले, हे त्यांनाही कळलं नाही, अशी टीका केशव उपाय यांनी केली.
‘महाराष्ट्राला आता शमीच्या झाडावरील शस्त्रे काढावीच लागतील’

इतकंच नाहीतर ‘महाविकास आघाडीत सामील झाल्याने हिंदुत्वाचा बुरखा फाटला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून तुम्ही माननीय बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. हे वारंवार दाखवून दिले. इतकंच नाहीतर महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होत नाही म्हणून रिक्षाचालकांना मारहाण केली, दुकानदारांना शिवीगाळ केली, महाविकास आघाडीच्या दहा तोंडी रावणाचा अहंकारही महाराष्ट्रातील जनताच मोडेल’ असही केशव उपाध्ये यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम सुरू, अशा लोकांनी युतीही केली – मोहन भागवतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: