पाकिस्तानच्या ‘लुटी’वर तालिबानचा आक्षेप; पाककडून विमानसेवा स्थगित


इस्लामाबाद : विमानसेवेचे दर पूर्वीप्रमाणे न ठेवल्यास विमानांवर बंदी घालण्याची धमकी तालिबानने दिल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानला जाणारी विमानसेवा स्थगित केली आहे. पाकिस्तानने सुरक्षाविषयक कारण दिले असले तरी तालिबानच्या धमकीने विमानसेवा स्थगित झाल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने विमानसेवा पुढील सूचनेपर्यंत स्थगित केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. ‘डॉन’ने हे वृत्त दिले आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि अफगाणिस्तानातील खासगी विमानकंपनी ‘काम एअर’ या दोन कंपन्या सध्या काबूलला विमानसेवा देत असून, त्यासाठी प्रचंड भाडे आकारले जात आहे. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने गुरुवारी या दोन्ही कंपन्यांना काबूल-इस्लामाबादचे भाडे पूर्वी होते तेव्हढेच आकारण्याची सूचना दिली. दरवाढ कमी न केल्यास विमानसेवा थांबविण्याची धमकीही दिली. त्यापाठोपाठ अफगाणिस्तानच्या नागरी विमान उड्डाण मंत्रालयानेही या दोन्ही कंपन्यांना पत्र पाठविले आहे. तालिबानने काबूलवर नियंत्रण मिळवण्यापूर्वी जे दर आकारले जात होते, तेव्हढेच दर आकारण्याची सूचना यात करण्यात आली आहे. मुजाहिद याने पश्तू आणि दारी भाषेतील पत्र प्रसिद्ध केले. तसेच, मंत्रालयाच्या फेसबुक पेजवरही ते प्रसिद्ध करण्यात आले. जर या दोन्ही कंपन्यांनी जर दर बदलले नाहीत तर प्रवाशांनी संपर्क साधावा, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

चिंताजनक! जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरण, पाकिस्तान, बांगलादेशनंतर क्रमांक

तालिबानची जगाला धमकी; अफगाणिस्तानवरील आर्थिक निर्बंधामुळे जागतिक सुरक्षा धोक्यात!
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल्ला खान या संदर्भात म्हणाले, ‘अन्य कंपन्यांनी सेवा थांबविली असताना कठीण परिस्थितीत काबूलची विमानसेवा आम्ही सुरू ठेवली होती. अफगाणिस्तानातील परिस्थिती बदलत असताना कंपनीने तीन हजार लोकांची सुटका केली. या लोकांमध्ये संयुक्त राष्ट्रे, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व अन्य जागतिक संघटनेचे अधिकारी, पत्रकार होते. कंपनीचे वैमानिक आणि कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून सुटकेचे कार्य केले आहे.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: