President Kovind: राष्ट्रपती कोविंद द्रासमध्ये जवानांसोबत साजरी करणार विजयादशमी!


हायलाइट्स:

  • गुरुवारी राष्ट्रपतींनी सिंधू घाट, लेहला दिली भेट
  • उधमपूरमध्ये जवानांशी साधला संवाद
  • आज राष्ट्रपती द्रास स्थित कारगील युद्ध स्मारकाला भेट देणार

नवी दिल्ली :राष्ट्रपती रामनाथ कोविंद जम्मू काश्मीर आणि लडाखच्या दौऱ्यावर आहेत. साधारणपणे राष्ट्रपती दसऱ्याचा सण राजधानी दिल्लीतच साजरा करतात परंतु, राष्ट्रपती रामनाथ कोविंद मात्र यंदा जवानांसोबत दसरा साजरा करणार आहेत.

आज द्रास स्थित कारगील युद्ध स्मारकाला आदरांजली देत सेनेच्या अधिकारी आणि जवानांसोबत राष्ट्रपती कोविंद संवाद साधणार आहेत.

Defense Companies: दसऱ्याला पंतप्रधानांकडून सात संरक्षण कंपन्यांचं राष्ट्राला समर्पण, कर्मचाऱ्यांचा मात्र बहिष्कार
poonch encounter : काश्मीरच्या पूंछमध्ये पुन्हा चकमक, लष्कराचा एक अधिकारी आणि एक जवान गंभीर जखमी

राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आपल्या या दौऱ्यात राष्ट्रपती लेह-लडाख आणि जम्मू काश्मीरला भेट देणार आहेत. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लेहमधील सिंधू घाटला भेट दिली. तसंच उधमपूरमध्ये सैनिकांसोबत संवादही साधला.

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. हा सण समाजाच्या नैतिक पाया आणखीन मजबूत करेल आणि सर्वांना राष्ट्र निर्माणासाठी प्रेरीत करेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. विजयादशमी अर्थात दसरा हा सण वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचं प्रतिक म्हणून साजरा केला जातो. हा सण आपल्याला नैतिकता, चांगुलपणा आणि योग्य मार्गावर वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देतो, असंही राष्ट्रपतींनी म्हटलंय.

यासोबतच, विजयादशमीच्या पवित्र निमित्तानं भारत आणि परदेशांत राहणाऱ्या आपल्या नागरिकांना राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.

rajnath hails indira gandhi : ‘इंदिरा गांधींनी युद्धावेळी देशाचे नेतृत्व केले’, राजनाथ सिंहांनी केले कौतुक
amit shah : ‘पाकिस्तानने सुधरावं अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होईल’, अमित शहांचा जाहीर इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: