कोकणात आता शिवसेनेकडून भाजपला धक्का; नगरसेवकासह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश


हायलाइट्स:

  • भाजपच्या विद्यमान नगरसेवकासह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
  • राजपूर नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का
  • कोकणात दोन्ही पक्षांकडून शह-काटशह देण्याचं राजकारण

रत्नागिरी :राजापूर नगरपरिषदेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंद चव्हाण यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राजपूर नगरपरिषदेत भाजपला मोठा धक्का बसला आहे. कारण या नगरपरिषदेत चव्हाण हे भाजपचे एकमेव नगरसेवक होते.

दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या राजापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताच शिवसेना आमदार डॉ.राजन साळवी यांनी भाजप नगरसेवकाला आपल्या पक्षात खेचण्यात यश मिळवलं. आमदार डॉ.राजन साळवी यांनी शिवबंधन बांधून गोविंद चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. चव्हाण यांच्यासह निनाद शिर्सेकर, नेहा चव्हाण, संपदा वाघरे, जयश्री महादये, स्मिता चिबुलकर, वैशाली पावसकर, मृण्मयी चव्हाण, संजय मोहिते, साईराज चव्हाण, चैतन्य शेट्ये, तन्मय शिवलकर, समीर नावेलकर आणि इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Jitendra Awhad: गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका; ‘या’ प्रकरणात कारवाई

पक्षप्रवेशाच्या या सोहळ्याला शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश कुवळेकर, जिल्हा महिला बालकल्याण सभापती भारती सरवणकर, तालुका पंचायत समिती सभापती करुणा कदम, उपतालुका प्रमुख रामचंद्र उर्फ तात्या सरवणकर, राजन कुवळेकर, विभाग प्रमुख कमलाकर कदम, संतोष हातनकर, पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव, प्रशांत गावकर, उपविभाग प्रमुख नंदू मिरगुले, शहर संघटक जितेंद्र मालपेकर आणि शिवसैनिक उपस्थित होते.

भाजपने दिला होता शिवसेनेला शह

खासदार नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष होत आहे. याच संघर्षातून दोन्ही पक्ष एकमेकांना शह-काटशह देण्याचा प्रयत्न करता दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ पंचायत समितीतील शिवसेनेच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: