विजयादशमीनिमित्त पंढरपुरात बुद्ध मूर्तीची मिरवणूक व कँडल रॅली
पंढरपूर / प्रतिनिधी – त्रिरत्न बौद्ध महासंघ पंढरपूर यांच्या वतीने ६५ व्या धम्मचक्र परिवर्तन दिना निमित्त अशोका विजयादशमी दिनी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.याआगोदर पंढरपूर शहरातून बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी त्रिरत्न बौद्ध महासंघाचे प्रभाकर सरवदे, पद्माकर सर्वगोड,रामचंद्र सर्वगोड,विलास माने, रामदास सर्वगोड,उमेश सर्वगोड,आशिष लांडगे, जितेंद्र आठवले, रामचंद्र खरात, वैभव दंदाडे, खंडू दंदाडे यांच्यासह बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रिरत्न बौद्ध महासंघ पंढरपूर यांच्यावतीने ६५ व्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त पंढरपूर येथील सारनाथ बुद्धविहार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत बौद्ध मूर्तीची मिरवणूक व कॅण्डल रॅली काढण्यात आली. मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा येथे पोहोचल्यानंतर बौद्ध बांधवां च्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर बौद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक (पुतळा) येथील सभागृहात त्रिशरण आणि पंचशीलाचे पठण करुन करण्यात आली.