पुढच्या वर्षी (२०२२) होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस विश्वासाने आणि धैर्याने पुढे जात आहे. यानुसार गोव्याची २०२२ ची विधानसभा निवडणूक आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच जिंकेल, असा विश्वास चिदम्बरम यांनी व्यक्त केला. गोव्याच्या २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत एकूण ४० जागांपैकी १७ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण भाजपने काही प्रादेशिक पक्षांची आणि अपक्ष आमदारांची मोट बांधून सरकार स्थापन केलं. यानंतर अनेक आमदारांनी काँग्रेस सोडली. आता गोव्यात काँग्रेसचे फक्त ४ आमदार आहेत.
amit shah : ‘पाकिस्तानने सुधरावं अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राइक होईल’, अमित शहांचा जाहीर इशारा
इतिहास काँग्रेसने रचला आहे. आजच्या शुभ दिवसापासून आपण सरवात करत आहोत. आपल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी केलं आहे. ते सोनेरी दिवस आठवा ज्यावेळी काँग्रेसची दिमाखात वाटचाल सुरू होती. उद्योग, शाळा-महाविद्यालये आणि रस्ते अशी विकासकामं केली, असं चिदम्बरम कार्यकर्त्यांना म्हणाले.
आपण २०२२ मध्ये काँग्रेसचे ते सुवर्ण युग पुन्हा आणू. सर्वांनी विश्वासाने आणि धैर्याने पुढे जावं, असं आवाहन चिदम्बरम यांनी कार्यकर्त्यांना केलं. गोवा कुठल्याही आक्रमणकर्त्याची राजकीय वसाहत बनू शकत नाही. गोव्यावर गोव्याच्या लोकांचे राज्य असेल, असं चिदम्बरम म्हणाले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईझिन्हो फालेरो यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस सोडून ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर चिदम्बरम बोलले. काँग्रेसने आपल्या नेत्यांचे चेहरे राज्यासमोर मांडले आहेत. येत्या काही दिवसांत पक्ष गोव्यावर शासन करण्यासाठी महिला, अनुसूचित जमाती, मच्छीमार समाज आणि दलितांसह अधिक युवा नेत्यांना समोर आणेल, असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम म्हणाले.
rahul gandhi : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून राहुल गांधींचा भाजपवर निशाणा; म्हणाले…