सोने ७०० रुपयांनी महागले ;दसऱ्याच्या पूर्वसंध्येला सोने झळाळले, जाणून घ्या आजचा भाव


हायलाइट्स:

  • साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसऱ्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.
  • दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे.
  • आज गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव ६८० रुपयांची वाढ झाली.

मुंबई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या विजया दशमी अर्थात दसऱ्याला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. उद्या शुक्रवारी दसरा असून त्याची लगबग सध्या सराफा बाजारात सुरु आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. आज गुरुवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव ६८० रुपयांची वाढ झाली. तर कमॉडिटी बाजारात सोने ४८ हजारांवर गेले.

एसबीआय करणार मेगा ई-लिलाव; महागडी घरे आणि जमीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी
उत्सव काळात सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. सलग तिसऱ्या सत्रात सोने आणि चांदी महागले. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८०५२ रुपये आहे. त्यात १३६ रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६३५४७ रुपये आहे. त्यात ६६० रुपयांची वाढ झाली आहे. त्याआधी चांदीचा भाव ६३६२७ रुपयांपर्यंत वाढला होता.

मुकेश अंबानींची टॉप-१० मध्ये झेप ; वॉरेन बफे यांना टाकलं मागे, केला नवा विक्रम
Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६९७० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४७९७० रुपये वाढला आहे. त्यात ६८० रुपयांची वाढ झाली. बुधवारी २८० रुपयांची वाढ झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६५८० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५१११० रुपये झाला आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०५० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१४० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५०००० रुपये इतका वाढला आहे.

आणखी एक दणका ; पेट्रोल आणि डिझेलमध्ये केली वाढ, जाणून घ्या आजचा दर
सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते. जागतिक कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव १७६८ डॉलरच्या आसपास आहे. चांदीचा भाव प्रती औंस २२.८० डॉलर आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: