हायलाइट्स:
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या टीकेला खासदार उदयनराजे भोसलेंचे प्रत्युत्तर.
- मी लोटांगण घालीन, गडगडत जाईन वा लोळत जाईन- उदयनराजे.
- स्कूटरवरून विकासकामांची पाहणी करणे ही उदयनराजेंती नौटंकी असल्याचं शिवेद्रसिंहराजेंनी म्हटलं होतं.
प्रतापगडावर देवीच्या दर्शनासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसलेंना प्रत्युत्तर दिले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शहराच्या विकासकामांवरून उदयनराजे भोसलेंवर टीकास्त्र सोडलं होतं. गेल्या पाच वर्षांमध्ये सातारा नगरपालिकेची सत्ता खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे. मात्र ते विकास करण्यात अपयशी ठरले आहेत. हे अपयश लवण्यासाठीच त्यांनी पोस्टरबाजी करून दुचाकीवर जात नौटंकी सुरू केली आहे, अशी टीका शिवेंद्रसिंहराजेंनी केली होती. त्यावर उदयनराजेंनी हे प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही दुचाकीवर जाऊ नाहीतर रांगत, गडगडत, लोळत जाऊ, ज्यांना कामे करायची नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करू नये, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर; ‘अशी’ पाहा विजेत्यांची यादी
सातारा शहरातील काही विकासकामांची उद्घाटने केली, तर काही कामांची पाहणी करत काही कामांचे भूमिपूजन केले. या कामांसाठी त्यांनी रविवारी शहरातून स्कूटरवर फेरी मारली. त्यानंतर दिवसभर शहरात उदयनराजेंची चर्चा होती. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्यावर टीका केली. ही उदयनराजेंची नौटंकी असल्याचे ते म्हणाले.
नेमके काय म्हणाले होते शिवेंद्रसिंहराजे भोसले?
उदयनराजेंवर टीका करताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, उदयनराजेंनी दुचाकी चालवण्यापेक्षा पाच वर्षे साताऱ्याची नगरपालिका जर व्यवस्थित चालवली असती तर त्यांच्यावर एवढी पोस्टरबाजी करण्याची वेळच आली नसती. असा पोस्टरबाजीवर खर्च करण्यापेक्षा साताऱ्याच्या विकासकामांवर खर्च केला असता तर फार बरं झालं असतं.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला जामीन मिळणार की नाही?; एनसीबीचे वकील कोर्टात म्हणाले…
शिवेंद्रसिंहराजेंच्या खरमरीत टीकेला उदयनराजेंचे जोरदार प्रत्युत्तर
शिवेंद्रसिंहराजेंना प्रत्यु्त्तर देताना उदयनराजे म्हणाले की, मला चारचाकी परवडत नाही. मी दुचाकीवरुन फिरेन, चालत फिरेन, रांगत फिरेन, माझे गुडघे दुखतात. हवं तर मी लोळत फिरेन, गडगडत जाईन. याबाबत कोणाला काय समस्या आहे?, असा सवाल करतानाच त्याबद्दल कोणाला दुख: वाटत असेल तर तुम्हीही तसं करा. लोकशाही आहे, असा टोला त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला.
क्लिक करा आणि वाचा- ‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल