पाहा: उत्तर कोरियाच्या जवानांचे प्रात्यक्षिक व्हायरल; किम जोंग यांचा अमेरिकेला इशारा


प्योंगयांग: उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र चाचणी सुरू असताना दुसरीकडे लष्कराच्या युद्ध सज्जतेवरही भर दिला जात आहे. उत्तर कोरियाच्या जवानांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ‘सेल्फ डिफेन्स २०२१’ या लष्करी जवानांच्या प्रदर्शनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत उत्तर कोरियाच्या जवानांकडून थरारक प्रात्याक्षिकांचे सादरीकरण केले जात आहे. हे सादरीकरण पाहण्यासाठी उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांच्यासह इतर नेतेही हजर होते. किम जोंग यांनी यावेळी केलेल्या भाषणात अमेरिकेवर निशाणा साधला.

या प्रदर्शनात उत्तर कोरियाच्या लष्करांनी आपले शक्तिप्रदर्शन केले. उत्तर कोरियाच्या सैनिकांनी डोक्यांनी विटा फोडल्या, तर काहींनी सिमेंटचे स्लॅब शरिरावर ठेवून हातोड्याने फोडल्या. उत्तर कोरियाच्या जवानांची शारिरीक आणि मानसिक कणखरपणा जोखणारे हे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्याशिवाय या प्रदर्शनात उत्तर कोरियाच्या ताफ्यात असणारे अनेक घातक शस्त्रेदेखील दाखवण्यात आले.

तैवान: १३ मजली इमारतीला भीषण आग, ४६ ठार, अनेक जखमी

तालिबानची जगाला धमकी; अफगाणिस्तानवरील आर्थिक निर्बंधामुळे जागतिक सुरक्षा धोक्यात!


उत्तर कोरियाने रेल्वेतून डागले क्षेपणास्त्र; कोरियन देशांमध्ये तणाव

अमेरिकेला इशारा

उत्तर कोरियाचे राष्ट्रपती किम जोंग उन यांनी यावेळी भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी अमेरिकेवर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, अमेरिकेकडून उत्तर कोरियाविरोधी पावले उचलली जात आहेत. उत्तर कोरियाने तयार केलेली शस्त्रे ही युद्धासाठी नसून आत्मसंरक्षणासाठी आहेत. आम्ही आपल्या देशाच्या सार्वभौमत्वासाठी ही पावले उचलत असल्याचे किम जोंग उन यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने चक्क रेल्वेतून क्षेपणास्त्र चाचणी केली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: