भारत बौद्धमय करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करू – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

भारत बौद्धमय करण्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करू – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.14/10/2021 – आतंकवाद नक्षलवाद देशातून समुळ नष्ट करण्यासाठी अहिंसा प्रज्ञाशील करुणा मानवता समता यावर आधारीत बौद्ध धम्माची देशाला गरज आहे.जगाला युद्धाची नव्हे बुद्धांची गरज आहे.त्यासाठी भारत बौद्धमय करण्याचे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करण्याची गरज आहे.त्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज केले.

   दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्यावतीने धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या 65 व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित सोहळ्यात ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी पूज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो; दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे चेयरमन हरीश रावलीया, मुंबई अध्यक्ष आयोजक घनश्याम चिरणकर, उद्योजक शाहीन चिष्टी, ऍड विजय ठाकूर,तानाजी गायकवाड,विवेक पवार, दयाळ बहादूर, सिद्धार्थ कासारे, अमित तांबे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 65 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त नामदार रामदास आठवले यांच्या हस्ते भिक्खू संघाला चिवरदान आणि भोजनदान देण्यात आले.  महमानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्म दीक्षा घेऊन धम्मचक्र प्रवर्तन केले.मोठी धम्मक्रांती केली. त्यांना संपूर्ण भारत बौद्धमय करायचा होता. भारतातील बौद्ध धम्म आज जगात पोहोचला आहे याचा आम्हाला अभिमान आहे. 14 ऑक्टोबर 1956 ला धम्म दीक्षा नागपूर येथे घेतल्यानंतर 16 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे भव्य धम्म दीक्षा सोहळा घ्यायचा होता. मात्र त्या पूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे मुंबईत धम्म दीक्षा सोहळा  घेण्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अधुरे राहिलेले स्वप्न आम्ही धम्मचक्र प्रवर्तनाच्या 50 व्या वर्षी पूर्ण केले.2006 साली मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे धम्म दीक्षा सुवर्ण महोत्सव सोहळा आम्ही आयोजित केला होता याची आठवण ना.रामदास आठवले यांनी केली. यावेळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा 65 वा वर्धापन दिन बांद्रा येथे आयोजित केल्याबद्दल घनश्याम चिरणकर यांचे ना.रामदास आठवले यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: