राष्ट्रवादीच्या आमदाराकडून मोठी चूक; नीलेश राणेंचं अजित पवारांना थेट आव्हान


मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे (NCP MLA Raju Navghare) यांच्याकडून मोठी चूक झाली. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नवघरे हे टीकेच्या रडारवर आले आहेत. माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी नवघरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

नवघरे हे राष्ट्रवादीचे हिंगोलीचे (Hingoli) आमदार आहेत. वसमत शहरात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी नवघरे हे थेट अश्वावरच उभे राहिले होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच सर्व स्तरांतून त्यांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका सुरू झाली. आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात येताच नवघरे यांनी तात्काळ माफी मागितली. ‘मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा कार्यकर्ता आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी वर चढलो होतो. मी याबद्दल माफी मागतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं त्यांच्यावर टीका सुरूच आहे.

वाचा: ‘या’ टप्प्यावर आर्यन खानला जामीन देऊ नये; NCB ची कोर्टाला विनंती

माजी खासदार नीलेश राणे यांनी नवघरे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवरही तोफ डागली आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांना भर चौकात फटके टाकले पाहिजे. राष्ट्रवादीवाल्यांना मस्ती आली आहे, यांची जिरवल्या शिवाय पर्याय नाही. नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, अजित पवार तुमच्यात हिम्मत असेल तर ह्याची पक्षातून हकालपट्टी करा. औरंगजेबच्या औलादी आहेत ह्या पक्षात,’ असं टीका नीलेश राणे यांनी केली आहे.

नीलेश राणे यांचं ट्वीट

आमदार नीतेश राणे यांनीही नवघरे यांचा तो फोटो ट्वीट करून राष्ट्रवादीवर शरसंधान साधलं आहे. ‘याला सत्तेचा माज म्हणतात. हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा: महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही: रणजीत सावरकरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: