विजयानंतर केकेआरला बसला मोठा धक्का, दिनेश कार्तिकवर बीसीसीआयने केली कारवाई, जाणून घ्या प्रकरण…


IPL 2021 : शारजाह : कोलकाता नाइट रायडर्सचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी तो दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक निवेदन प्रसिद्ध करून याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनेश कार्तिकने आयपीएल आचारसंहितेअंतर्गत आपली चुक स्विकारली आहे.
दिनेश कार्तिकने नेमकं केलं तरी काय, पाहा…
दिनेश कार्तिक दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात बाद झाला आणि त्याचा आपल्या रागावर ताबा राहिला नाही. बाद झाल्यावर कार्तिकने मैदानातील एक स्टम्प आपल्या हाताने रागाच्या भरात पाडला. त्यामुळे कार्तिकवर ही कारवाई करण्यात आली आहे. पण कार्तिकने केलेली ही चुक गंभीर नक्कीच नाही. त्यामुळे फायनलच्या सामन्यात कार्तिक खेळणार असल्याचे आता समजते आहे.
शारजामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा तीन गडी राखून पराभव केला. यासह कोलकाताचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. पहिल्यांदा फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने २० षटकांत पाच गडी गमावून १३५ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात कोलकाताने २० षटकात सात गडी गमावत लक्ष्य गाठले. केकेआरला शेवटच्या दोन चेंडूंवर विजयासाठी सहा धावांची गरज होती. तेव्हा राहुल त्रिपाठीने अश्विनला शानदार षटकार ठोकून आपल्या संघाला अंतिम फेरीत नेले.

आयपीएल २०२१चा पहिला टप्पा कोलकाता नाईट रायडर्ससाठी तितकासा चांगला नव्हता. संघ स्पर्धेतून बाद जातो की काय अशी एकवेळ परिस्थिती निर्माण झाली होती, पण यूएईमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या टप्प्यात संघाने जबरदस्त पुनरागमन तर केलेच, पण आता अंतिम फेरीतही स्थान मिळवले आहे. केकेआर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी पहिल्या एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा पराभव केला आणि नंतर दिल्ली कॅपिटल्ससारख्या बलाढ्य संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात पराभूत करत अंतिम फेरी गाठली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: