हायलाइट्स:
- म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ८ हजार ९४८ घरांची सोडत जाहीर
- काशिनाथ घाणेकर सभागृहात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते निघाली सोडत
- ८ हजार ९४८ सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार.
ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या हस्ते ही सोडत काढण्यात आली. http://mhada.ucast.in या संकेतस्थळावरून सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार १०० जणांना सभागृहात प्रवेश देण्यात आला होता.
क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानला जामीन मिळणार की नाही?; एनसीबीचे वकील कोर्टात म्हणाले…
सकाळी १० वाजल्यापासून सोडतीला सुरुवात झाली. संकेत क्रमांकानुसार ही ऑनलाइन सोडत काढण्यात आली. सोडत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजेत्यांच्या नावांची यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल
सोडतीच्या या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, तसेच ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी हजेरी लावली.
क्लिक करा आणि वाचा- मावळ घटनेला भाजप जबाबदार, लोकांच्या हे लक्षातही आलं: पवार