एसबीआय करणार मेगा ई-लिलाव; महागडी घरे आणि जमीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी


हायलाइट्स:

  • एसबीआय येत्या २५ ऑक्टोबरला ई-लिलाव आयोजित करणार आहे.
  • याअंतर्गत सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घर, प्लॉट किंवा दुकानांवर बोली लावता येईल.
  • एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला खरेदीची संधी देत आहे. महागड्या मालमत्ता स्वस्तात खरेदी करण्याची संधी एसबीआयने उपलब्ध करून दिली आहे. गहाण ठेवलेल्या व्यावसायिक आणि निवासी मालमत्तांसाठी एसबीआय येत्या २५ ऑक्टोबरला ई-लिलाव आयोजित करणार आहे. याअंतर्गत सध्याच्या बाजारभावापेक्षा कमी किंमतीत घर, प्लॉट किंवा दुकानांवर बोली लावून ते जिंकण्याची संधी मिळणार आहे. एसबीआयने ट्विट करून ही माहिती दिली आहे.

मुकेश अंबानींची टॉप-१० मध्ये झेप ; वॉरेन बफे यांना टाकलं मागे, केला नवा विक्रम
एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, तुमची पुढील मोठी गुंतवणूक करण्याची संधी इथे आहे. ई-लिलावात सामील व्हा आणि तुमची सर्वोत्तम बोली लावा. थकबाकी वसूल करण्यासाठी बँका थकबाकीदारांच्या गहाण मालमत्तांचा लिलाव करतात.

शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ६१००० अंकावर, गुंतवणूकदारांची कमाई
एसबीआयने सांगितले की, न्यायालयाच्या आदेशांचे पालन करताना बँकेकडे गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तांच्या लिलावासाठी आम्ही अत्यंत पारदर्शक आहोत. सर्व संबंधित तपशील सादर करून आम्ही बोली लावणाऱ्यांना लिलावात सहभागी होण्यासाठी एक आकर्षक प्रस्ताव बनवू शकतो. सदर मालमत्ता फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड आहे की नाही, याचा सर्व तपशील देखील आम्ही समाविष्ट करतो. लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये इतर तपशीलांसह त्याचे मोजमाप, स्थान इ. माहितीदेखील आम्ही पुरवतो. लिलाव प्रक्रिया आणि मालमत्तेसंदर्भातील कोणत्याही स्पष्टीकरणासाठी आणि तपासणी करण्यासाठी संभाव्य खरेदीदार बँकेशी संपर्क साधू शकतात.

सोनं तेजी कायम ; सलग दुसऱ्या सत्रात महागले सोने, जाणून घ्या आजचा दर
मेगा ई-लिलावात असा घ्या भाग
ई-लिलाव नोटीसमध्ये दिलेल्या संबंधित मालमत्तेसाठी ईएमडी सादर करावा लागेल. ‘केवायसी कागदपत्रे’ संबंधित बँक शाखेत दाखवावी लागतात. लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे डिजिटल स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. नसल्यास, यासाठी ई-लिलावकर्ता किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीशी संपर्क साधला जाऊ शकतो.

ई-लिलावकर्ता संबंधित बँक शाखेत ईएमडी जमा केल्यानंतर आणि केवायसी कागदपत्रे दाखवल्यानंतर बिडरच्या ई-मेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवेल. लिलावाच्या नियमांनुसार, ई-लिलावाच्या दिवशी वेळेवर लॉग-इन करून बोली लावली जाऊ शकते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: