महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही: रणजीत सावरकर


हायलाइट्स:

  • सावरकरांविषयी राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावर चर्चा सुरूच
  • आता रणजीत सावरकर यांनी राष्ट्रपिता शब्दाला घेतला आक्षेप
  • गांधीजी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही – रणजीत सावरकर

मुंबई: ‘भारताला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे आणि या देशाच्या उभारणीत अनेकांचं योगदान आहे. त्यामुळं कुणीही एक व्यक्ती या देशाचा राष्ट्रपिता होऊ शकत नाही. त्यामुळं गांधीजी (Mahatma Gandhi) हे भारताचे राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही. मुळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही,’ असं परखड मत स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर (Ranjit Savarkar) यांनी व्यक्त केलं आहे.

सावरकर यांच्याविषयीच्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद सुरू आहे. महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरूनच सावरकरांनी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता, असा दावा राजनाथ यांनी केला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघाचलक मोहन भागवत हे देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. भागवत यांच्या उपस्थितीत राजनाथ यांनी केलेल्या या विधानावरून उलटसुलट मतं व्यक्त होत आहेत. राजनाथ यांच्या विधानानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. ‘इतिहासाचा विपर्यास करण्याचं काम हे लोक करत आहेत. हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस हे लोक महात्मा गांधी यांच्या ऐवजी सावरकरांना राष्ट्रपिता घोषित करतील,’ अशी भीती ओवेसी यांनी व्यक्त केली होती.

वाचा: आर्यन खान नियमित ड्रग्ज घेत असल्याचं प्रथमदर्शनी पुराव्यातून दिसतं – NCB

ओवेसी यांच्या या मतावर रणजीत सावरकर यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते एएनआयशी बोलत होते. ‘भारत हा केवळ ४० किंवा ५० वर्षे जुना देश नाही. या देशाला ५ हजार वर्षांची परंपरा आहे. हजारो असे लोक आहेत, ज्यांनी या देशाच्या उभारणीत योगदान दिलंय, मात्र ते लोक आज विसरले गेले आहेत. आपल्या देशात कोणतीही एक व्यक्ती राष्ट्रपिता होऊ शकत नाही. महात्मा गांधी राष्ट्रपिता आहेत असं मला वाटत नाही. सावरकरांना राष्ट्रपिता घोषित करण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. मुळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही,’ असं रणजीत सावरकर म्हणाले.
वाचा: आनंदराव अडसूळ यांना धक्का; ED चौकशीविरोधी याचिका कोर्टाने फेटाळलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: