मुकेश अंबानींची टॉप-१० मध्ये झेप ; वॉरेन बफे यांना टाकलं मागे, केला नवा विक्रम


हायलाइट्स:

  • अंबानींच्या संपत्तीत या वर्षी २४.७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.
  • ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती आता १०१ अब्ज डॉलर झाली आहे.
  • जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १० व्या क्रमांकावर आले आहेत.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याने आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या निव्वळ उत्पन्नामध्ये बुधवारी १.३० अब्ज डॉलरची वाढ झाली. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती आता १०१ अब्ज डॉलर झाली आहे आणि जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १० व्या क्रमांकावर आले आहेत. अमेरिकेतील दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांना त्यांनी मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. अंबानींच्या संपत्तीत या वर्षी २४.७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

शेअर बाजारात दिवाळी; सेन्सेक्स पहिल्यांदाच ६१००० अंकावर, गुंतवणूकदारांची कमाई
अदानींच्याही उत्पन्नात वाढ
दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांची या यादीत एका स्थानाने प्रगती झाली आहे. ७५.७ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १३ व्या क्रमांकावर आले आहेत. अंबानींनंतर ते भारत आणि आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी आणि अदानी यांच्यामध्ये वॉरेन बफे (११ व्या स्थानी) आणि जगातील सर्वात श्रीमंत महिला फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स (१२ व्या स्थानी) आहेत.

सोनं तेजी कायम ; सलग दुसऱ्या सत्रात महागले सोने, जाणून घ्या आजचा दर
दमानींची मोठी उडी
हायपरमार्केट चेन डी मार्ट (D-Mart) चालवणाऱ्या अॅवेन्यू सुपरमार्ट्स (Avenue Supermarts) चे संस्थापक आणि अनुभवी गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत ६ स्थानांनी कामगिरी उंचावली आहे. दमानी आता ५७ व्या स्थानी पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअरने बुधवारी नवीन विक्रम गाठला होता. यामुळे दमानीमची संपत्ती २.०१ अब्ज डॉलरने वाढून २६.६ अब्ज डॉलर झाली.

आणखी एक दणका ; पेट्रोल आणि डिझेलमध्ये केली वाढ, जाणून घ्या आजचा दर
अव्वलस्थानी कोण आहे?
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क हे २२८ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अॅमेझॉनचे जेफ बेझोस १९१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. फ्रेंच व्यापारी आणि जगातील सर्वात मोठ्या लक्झरी वस्तू कंपनी LVMH Moët Hennessy चे अध्यक्ष बर्नार्ड अर्नाल्ट (१६१ अब्ज डॉलर्स) यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स (१२८ अब्ज डॉलर) चौथ्या क्रमांकावर आहेत.

टॉप-१० मध्ये अमेरिकेचे आठजण
अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ आणि इंटरनेट उद्योजक लॅरी पेज १२३ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर आहेत. अमेरिकन मीडिया जायंट आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग १२१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत. गुगलचे सह-संस्थापक सेर्गेई ब्रिन ११८ अब्ज डॉलर्ससह सातव्या, ११० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह लॅरी एलिसन आठव्या स्थानावर आहेत. अमेरिकन व्यापारी आणि गुंतवणूकदार स्टीव्ह बाल्मर १०६ अब्ज डॉलर्ससह नवव्या स्थानावर आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: